ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंस्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनियरिंग विभागातील पाच विद्यार्थ्याची नागपूर येथील कोलब्रो प्रा. लि. या नामांकित कंपनी मध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.

नागपूर येथील कोलब्रो प्रा. लि या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून सिव्हिल इंजिनियरिंग विभागातील हृषीकेश गाजरे, सौरभ गाढवे, हर्षवर्धन नागटीळक, प्रवीण माने, सागर होनमाने या विद्यार्थ्याची निवड केली आहे. कोलब्रो प्रा. लि ही बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. दर वर्षी प्रमाणेच शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये ही कर्मयोगीने प्लेसमेंट क्षेत्रामद्धे आपले प्रभुत्व कायम ठेवले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्याधीच च विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड होताना दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे प्रशिक्षण हे नोकरी लागण्यासाठी अतिशय पूरक व उपयोगी होत आहे असे निवड झालेले विद्यार्थी आवर्जून सांगतात.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दीपक भोसले, प्रा. एस एम लंबे, प्रा. अभिनंदन देशमाने व इतर सर्व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *