ताज्याघडामोडी

चुकून बँक अकाउंटमध्ये आले 26 लाख, पठ्ठ्या परत द्यायलाच नाही तयार; अखेर बँकेने…

ऑनलाइन बँकिंगचं प्रमाण वाढलं आहे. अशावेळी आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत हे चेक करण्यासाठी बँकेत जायची गरज नसते. बँकेत पैसे जमा झाले किंवा विड्रॉल केले तर आपल्याला मेसेज येतो. दरम्यान अनेकांच्या अकाउंटमध्ये अचानक लाखो रुपये जमा झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. असंच काहीसं नोएडामधील एका व्यक्तीच्या बाबतीत घडलं. मात्र या पठ्ठ्याने ही रक्कम परत करण्यासच नकार दिलाय. नोएडामध्ये एका खासगी बँकेने एका व्यक्तीवेर 26,15,905 रुपये हडप करण्याचा आरोप करत त्याच्याविरुदोता प्रकरणं नोंदलवयं. तांत्रिक बिघाडामुळे बँकेने चुकीने आरोपी व्यक्तीच्या अकाउंटमध्ये रक्कम ट्रान्सफर केली होती. या व्यक्तीने ही रक्कम तक्काळ चेक आणि ऑनलाइन माध्यमातून काढून हडप करुन घेतली आहे.

खासगी बँकेचे अधिकारी पंकज बांगर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सायबर क्राईम पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात नीरज कुमार नावाच्या व्यक्तीकडून 58 हजार रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. ज्यात तत्काळ तक्रार नोंदवल्यामुळे बँकेकडून फसवणुकीचे 58 हजार रुपये तत्काळ फ्रीज करण्यात आले. स्थानिक कोर्टाच्या आदेशानंतर कुमारचे फसवणुकीत गेलेले पैसे बँकेकडून पुन्हा अकाउंटमध्ये परत केले.

अधिकाऱ्याने सांगितले की, या कालावधीत तांत्रिक बिघाडामुळे 58 हजार रुपयांऐवजी एकूण 26,15,905 रुपये बँकेतून नीरज कुमार यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. त्यापैकी कुमार यांनी लगेचच 13,50,000 रुपये चेकद्वारे ट्रान्सफर केले. उर्वरित रक्कम ऑनलाइन माध्यमातून दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये ट्रन्सफर केली.

बँकेच्या दक्षता पथकाने तपास केला असता संपूर्ण घटना उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, यानंतर नीरज कुमारला बँकेने पैसे परत करण्यास सांगितले, परंतु त्याने अप्रामाणिकपणे रक्कम हडप केली. अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्टेशन प्रभारी यांनी सांगितले. पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *