गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वादातून नातवाने आजीला संपवलं, आई-वडिलांनीही दिली साथ, पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मात्र…

जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नुकतीच एक हत्येची घटना समोर आली आहे. क्षुल्लक वाद झाल्याने सुनेने पती आणि मुलाच्या मदतीने वृद्ध सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही थरारक घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामडोंगरी येथे घडली. सुलकाबाई चाचेरे (८०) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी किसन जोंधरू चाचेरे, त्याची पत्नी सेवनबाई (५०) आणि मुलगा मुन्नालाल किसन चाचेरे या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून किसनला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाचेरे कुटुंबीय मुळचे चोपा, ता. गोरेगाव, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी आहेत. ते रामडोंगरी (ता. सावनेर) शिवारातील पौनीकर, रा. खापरखेडा, ता. सावनेर यांच्या विटांच्या भट्टीवर कामगार म्हणून काम करण्यासाठी आले होते. ते भट्टीच्या आवारात असलेल्या झोपडीत राहायचे. मुन्नालाल आणि सुकलाबाई यांच्यात नेहमीच भांडणे व्हायची. सोमवारी रात्रीही त्या दोघांचे भांडण झाले. याच भांडणात मुन्नालालने सुकलाबाईच्या डोक्यावर दगडाने वार केले. गंभीर दुखापतीमुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुकलाबाईचा मृत्यू होताच तिघांनी तिचा मृतदेह ओढत झोपडीत नेला. त्यानंतर तो मृतदेह पोत्यात बांधला. जवळच असलेल्या जंगलात फेकला.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी किसनने सोमवारी सकाळी खापा पोलिस ठाणे गाठून सुकलाबाई बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. मात्र त्याच्या बोलण्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. खुनाची कबुली देताच त्याच्यासह पत्नीला अटक केली. याच काळात मुख्य आरोपी मुन्नालाल पळून गेला. पुरावे नष्ट करण्यासाठी मुन्नालाल, त्याची आई आणि वडिलांनी सुकलाबाईचा मृतदेह जंगलात फेकला. पोलिसांनी हितेश बनसोड यांच्या मदतीने जंगलातून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी खापा पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार मनोज खडसे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *