ताज्याघडामोडी

धनंजय मुंडेंविरोधात दुसऱ्या पत्नीची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : काही दिवसापूर्वीच एक महिलेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. पण त्यानंतर तक्रारदार तरुणीने आपली तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

देवीच्या जागरणासाठी आलेल्याना गुंगीचे औषध देऊन लुटले

कोल्हापूर: देवीचा जागर घालण्यासाठी लातूरहून आलेल्या कलाकारांना जेवणात गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका यात्री निवासमध्ये हा प्रकार घडला असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. लातूर जिल्ह्यातील रायतेवाडी या गावातील काही कलाकारांशी कोल्हापुरातील एका व्यक्तीने संपर्क साधून जागर करण्याचा कार्यक्रम निश्चित केला. त्यासाठी त्यांनी काही रक्कम ऑनलाइन अदा केली. ही […]

ताज्याघडामोडी

संजय गांधी निराधार योजनेत 68 प्रकरणे मंजूर

पंढरपूर, दि. 03:-  तहसिल कार्यालय पंढरपूर येथे तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत  निराधार अनुदान योजनेची 68 प्रकरणे मंजूर करण्यात आली. समीतीच्या सभेत संजय गांधी निराधार योजनेचे 46 व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 22 प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याची तहसिलदार विवेक सांळुखे यांनी दिली.   राज्यशासना मार्फत संजय गांधी निराधार योनेत निराधार, वृध्पकाळ, […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर व तालुक्यातील युवक काँग्रेसला मिळाले नवे शिलेदार

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहर व तालुक्यातील युवक काँग्रेसला आता नवे शिलेदार मिळाले असुन माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुतन पदाधिकार्‍यांच्या दि. 2 फेब्रुवारी रोजी निवडी करण्यात आल्या. युवक काँग्रेस आय च्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी शंकर सुरवसे (पंढरपूर) यांची  तर पंढरपूर शहर कार्याध्यक्षपदी सागर कदम (पंढरपूर) यांची तसेच पंढरपूर तालुकाध्यक्षपदी मिलींद भोसले (गादेगाव, ता.पंढरपूर) […]

ताज्याघडामोडी

सह आयुक्तांनी पाणी समजून पिले सॅनिटायझर

मुंबई, 03 जानेवारी : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. परंतु, अर्थसंकल्प सादर होत असताना सह आयुक्त रमेश पवार हे पाण्याऐवजी सॅनिटाझर प्यायल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज मुंबई महापालिकेच्या सभागृहात चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. बजेटचे वाचण सुरू होण्यापूर्वी सह आयुक्त रमेश पवार यांनी पाण्याऐवजी हात […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरकरांनो सावधान,तुम्ही अप्रमाणित खाद्यतेलाचा वापर करीत नाही ना ?

बाजरात वितरित खाद्यतेलाची विक्री अन्न विभाग रोखणार ? एकीकडे खाद्य तेलाचे दर वरचेवर वाढत चालले असतानाच काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात खाद्य तेलावरील आयात शुल्कातव वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे खाद्य तेल बाजरात खाद्य तेलाचे काही उत्पादक आणि साठेबाज आणखी खुशीत असताना व मोठ्या प्रमाणात भेसळ करून अथवा अन्न सुरक्षा मानकांचे पालन न करता खाद्य तेल उत्पादित अथवा री पॅकिंग करून तसेच अनेकवेळा सुप्रसिद्ध ब्रॅण्डच्या नावाशी साधर्म्य […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नवीपेठ खून प्रकरणीपुणे मोक्का न्यायालयाने गॅंग लीडरसह २२ जणांची केली निर्दोष मुक्तता 

पुणे शहरातील घायवळ आणि मारणे गॅंगचे वैमनस्य हा केवळ पुणे शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असून घायवळ टोळीतील अमोल बधे याची २९ नोव्हेंबर २०१४ रोजी नवीपेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणी मारणे गँगचा लीडर गजानन मारणे याच्यासह २२ आरोपी विरोधात मोक्का न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.  या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष मोका न्यायाधीश एम.वाय.थत्ते यांनी सर्व […]

ताज्याघडामोडी

भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरु करा – शैला गोडसे

मंगळवेढा तालुक्‍याच्या दक्षिण भागातील 39 गावाची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या सात महिन्यापासून बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे सदरची योजना तातडीने सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या जिल्हा नेत्या शैला गोडसे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.  या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या […]

ताज्याघडामोडी

सोशल मीडियावरील खोट्या बातम्या आपोआप डिलीट होणार 

खोट्या बातम्या आणि आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करून गोंधळाची स्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न रोखले जावेत अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून याचिकाकर्त्याने मांडलेल्या मुद्द्याची गंभीर दखल घेत मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.      सोशल मीडियावरून विविध खोट्या बातम्या,आक्षेपार्ह मजकूर व जनभावना भडकावणारा मजकूर पोस्ट केला जात असताना सोशल मीडिया […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या एमबीए मधील ११ विद्यार्थ्यांची इनोवेटीव्ह कन्सल्टंन्सी अँड सर्व्हिसेस कंपनीत निवड

स्वेरीच्या एमबीए मधील ११ विद्यार्थ्यांची इनोवेटीव्ह कन्सल्टंन्सी अँड सर्व्हिसेस कंपनीत निवड     पंढरपूरः ‘इनोवेटीव्ह कन्सल्टंन्सी अँड सर्व्हिसेस’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी (श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट) संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय अंतर्गत असलेल्या एमबीए या पदव्युत्तर पदवी विभागातील ११ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती […]