मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील 39 गावाची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या सात महिन्यापासून बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे सदरची योजना तातडीने सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या जिल्हा नेत्या शैला गोडसे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने 39 गावासाठी राबवण्यात आलेल्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे 31 मे 2020 अखेरीस हस्तांतरण करण्यात आले असून ही योजना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात आली परंतु योजना वर्ग झाल्यापासून आजतागायत या भागातील लोकांना पाणी मिळणे बंद झाली त्यामुळे येथील नागरिकांनासह ग्रामपंचायतीला येथील पाणीपट्टीचा भुर्दंड भरावा लागणार आहे. गतवर्षी समाधान समाधानकारक पावसामुळे उजनी धरण पूर्णपणे भरले आहे त्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार नाही मात्र प्रशासनाकडून मात्र योजना बंद ठेवून सोयीस्कररित्या जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे पुढील महिन्यात सुरू होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ही योजना तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने ही योजना सुरू करण्याच्या बाबतीत लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेल्या काय झालं निवेदनात नमूद केली आहे





