ताज्याघडामोडी

पंढरपूरकरांनो सावधान,तुम्ही अप्रमाणित खाद्यतेलाचा वापर करीत नाही ना ?

बाजरात वितरित खाद्यतेलाची विक्री अन्न विभाग रोखणार ?

एकीकडे खाद्य तेलाचे दर वरचेवर वाढत चालले असतानाच काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात खाद्य तेलावरील आयात शुल्कातव वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे खाद्य तेल बाजरात खाद्य तेलाचे काही उत्पादक आणि साठेबाज आणखी खुशीत असताना व मोठ्या प्रमाणात भेसळ करून अथवा अन्न सुरक्षा मानकांचे पालन न करता खाद्य तेल उत्पादित अथवा री पॅकिंग करून तसेच अनेकवेळा सुप्रसिद्ध ब्रॅण्डच्या नावाशी साधर्म्य असलेले लोगो व नाव वापरून मोठी नफेखोरी करण्याच्या नादात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.आज अन्न विभागाने अशा नफेखोर व अप्रमाणित खाद्य तेल उत्पादक व रिपॅकिंग करणाऱ्या राज्यातील अनेक नामांकित व्यवसायिकांवर धाडी टाकत  कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त केला आहे.  अन्न विभागाने केलेल्या कारवाईत ९३ पैकी ४९ नमुने अप्रमाणित आढळले असून अप्रमाणित नमुने आढळलेल्या खाद्यतेल उत्पादक आणि रिपॅकर्स यांनी राज्यभर वितरित होणाऱ्या साठ्यावर काय कारवाई होणार याबाबत कुठलीही अधिकृत माहिती अन्न विभागाने अजून दिलेली नाही मात्र या पैकी अनेकांचे राज्यभर वितरणाचे मोठे जाळे असून सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर शहरात हे अप्रमाणित असा ठपका ठेवलेले खाद्य तेल वितरित होत असेल तर कारवाई होणे गरजेचे आहे. 

      दोन महिन्यापूर्वी पंढरपूर शहरातील एका बड्या व नामांकित ब्रॅण्डच्या नावाशी साधर्म्य असलेल्या ऑईलमिल वर केलेल्या कारवाईत मोठा साठा सील केल्याची माहिती सह.आयुक्त (अन्न ) सोलापूर यांनी दिली होती.मात्र या कारवाईत खाद्य तेल खरेच अप्रमाणित होते कि नाही याबाबत अधिकृत माहिती अजूनही अन्न विभागाकडून कारवाई केल्यानंतर दिलेल्या प्रसिद्धीकरणा प्रमाणे देण्यात आली नाही त्या मुळे या बाबतही संभ्रम कायम आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *