मुंबई : काही दिवसापूर्वीच एक महिलेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. पण त्यानंतर तक्रारदार तरुणीने आपली तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. यात १४ वर्षाची मुलीचाही समावेश असून, ती देखील सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी याप्रकरणी आपल्यास सहकार्य केले नाहीतर आपण २० फेब्रूवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
