गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नवीपेठ खून प्रकरणीपुणे मोक्का न्यायालयाने गॅंग लीडरसह २२ जणांची केली निर्दोष मुक्तता 

पुणे शहरातील घायवळ आणि मारणे गॅंगचे वैमनस्य हा केवळ पुणे शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असून घायवळ टोळीतील अमोल बधे याची २९ नोव्हेंबर २०१४ रोजी नवीपेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणी मारणे गँगचा लीडर गजानन मारणे याच्यासह २२ आरोपी विरोधात मोक्का न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. 

या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष मोका न्यायाधीश एम.वाय.थत्ते यांनी सर्व २२ आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.या खटल्याच्या निकाला बाबत पुणे शहरात मोठी उत्सुकता होती.आरोपीची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता सरकार पक्षातर्फे वरिष्ठ न्यायालयात अपील केले जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *