ताज्याघडामोडी

सोशल मीडियावरील खोट्या बातम्या आपोआप डिलीट होणार 

खोट्या बातम्या आणि आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करून गोंधळाची स्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न रोखले जावेत अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून याचिकाकर्त्याने मांडलेल्या मुद्द्याची गंभीर दखल घेत मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.  

   सोशल मीडियावरून विविध खोट्या बातम्या,आक्षेपार्ह मजकूर व जनभावना भडकावणारा मजकूर पोस्ट केला जात असताना सोशल मीडिया म्हणून ओळखले जाणारे व्हाट्स अप,फेसबुक,ट्विटर आदी माध्यमे यावर कुठलीही कारवाई करत नाहीत व शहनिशा करत नाहीत त्यामुळे हि बाब गंभीर असल्याचे याचिका कर्त्याचे म्हणणे आहे.   या बाबत विविध सोशल मीडिया ऑपरेटर कंपन्यांनाही नोटीस बजावण्यात आली असून आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश न्या.बोबडे, न्या. बोपण्णा, न्या.सुब्रम्हण्यम यांनी दिले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *