ताज्याघडामोडी

संजय गांधी निराधार योजनेत 68 प्रकरणे मंजूर

पंढरपूर, दि. 03:-  तहसिल कार्यालय पंढरपूर येथे तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत  निराधार अनुदान योजनेची 68 प्रकरणे मंजूर करण्यात आली. समीतीच्या सभेत संजय गांधी निराधार योजनेचे 46 व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 22 प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याची तहसिलदार विवेक सांळुखे यांनी दिली.

  राज्यशासना मार्फत संजय गांधी निराधार योनेत निराधार, वृध्पकाळ, अपंगत्व, विधवा, दुर्धर आजार व मानसिक आजाराने ग्रस्त नागरिक तसेच श्रावणबाळ योजनेत 65 वर्षावरील वृध्द निराधार व्यक्तींना लाभ दिला जातो. या योजनेचा तालुक्यातील जास्तीत जास्त गरजू व पात्र लाभार्थ्यांनी लाभ  घ्यावा. तसेच  ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत त्यांनी बँक पास बुकची छायाकिंत प्रत व फोटो तात्काळ तहसिल कार्यालय पंढरपूर येथे जमा करावेत असे आवाहन तहसिलदार साळुंखे यांनी केले आहे.

तालुक्यातील जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना अनुदानाचा लाभ घेत आहे आहेत. अशा लाभार्थ्यांनी माहे जानेवारी ते मार्च 2021 या कालावधीत हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र  प्रत्यक्ष हजर  राहून  सादर करावेत. अन्यथा माहे एप्रिल 2021 पासन संबधित लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्यात येईल असे आवाहनही तहसिलदार साळुंखे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *