चंदीगढ 07 मे : देशात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली जात आहे. या परिस्थितीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली असून त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशात आता समोर आलेल्या एका घटनेनं सर्वांनाच विचारात पाडलं आहे. कारण, प्रचंड मागणी असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन कॅनॉलमध्ये आढळून आले आहेत. यात रेमडेसिवीर आणि चेस्ट इन्फेक्शनच्या इंजेक्शनचा समावेश आहे. […]
ताज्याघडामोडी
गर्दी का केली? असा सवाल विचारणाऱ्या पोलिसांनाच मारहाण
सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर, प्रशासन, पोलीस आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. लोकांच्या संरक्षणासाठी आणि सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन व्हावे म्हणून पोलीस दिवस रात्र एक करून त्यांची ड्युटी निभावत आहे. मात्र काही ठिकाणी अशा घटना घडत आहे तिकडे […]
धक्कादायक! मृतदेहांची अदलाबदल, चूक लक्षात आल्यानंतर पुरलेला मृतदेह काढला बाहेर
लातूर, 07 मे: वैद्यकीय महाविद्यालयातील गलथान कारभार लातुरमध्ये समोर आला आहे. मृतदेहांची अदलाबदल झाल्यानंतर शेळगाव (ता.चाकूर) येथे अंत्यविधी करण्यात आलेला मृतदेह जमिनीतून उकरून काढण्यात आला आणि त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील धोंडीराम तोंडारे (वय 65) यांना मागील आठवड्यात कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर उदगीर येथे उपचार करून लातूर येथील […]
कोरोना पॉझिटिव्ह माजी ग्रामपंचायत सदस्याची जंगी वाढदिवस पार्टी; रक्तदान शिबीराचंदेखील आयोजन
कोरोना पॉझिटिव्ह असताना रक्तदान शिबीर घेऊन जंगी वाढदिवस साजरा करणाऱ्या विजयनगर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राकेश श्रीपाल कुरणे याच्यावर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत म्हैसाळ तलाठी सुधाकर कृष्णा कुणके यांनी फिर्यादी दिली आहे.राकेश कुरणे हा काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला आशा वर्कर आणि आरोग्य सेवकांनी घरी क्वारंटाईन होण्याच्या […]
पुढील पाच दिवसात १८ ते ४४ वयोगटासाठी फक्त कासेगाव आरोग्य केंद्रावर होणार लसीकरण
राज्य शासनाने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागिरकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला खरा पण केंद्र सरकारकडून व लस उत्पादक कंपनीकडून होणारा लसीचा अपुरा पुरवठा आणि दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेले ४५ वयोगटावरील जेष्ठ नागिरक यामुळे राज्य सरकार देखील अडचणीत आले आहे.१८ ते ४४ वयोगटासाठी कोवीन ऍप द्वारे नोंदणी करण्यास २८ एप्रिल […]
देशातील पहिलीच घटना : खून करणा-या अल्पवयीन आरोपीस बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
सांगली | मिरज तालुक्यातल्या तुंग येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी नराधम अल्पवयीन 17 वर्षीय मुलास न्यायालयाने दोषी धरून भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३६३, ३७६, ३७६ (अ), ३७६ (अ,ब), ३७७ (अ) तसेच पोक्सो कायदयांतर्गत कलम ४ व ६ खाली दोषी धरून प्रत्येक कलमांसाठी वेगवेगळी बारा वर्षे व प्रत्येक कलमान्वये १ हजार रुपये दंड […]
राज्यातील १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण थांबण्याची शक्यता
मुंबई : 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यात विकत घेण्यात आलेली कोव्हॅक्सिन लस 45 वर्षावरील नागरिकांना देण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक ठिकाणी 45 वयोगटातील नागरिकांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकार अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरु झाला असून त्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोनाची […]
गुंगीचा पेढा देऊन महिलेकडील अडीच लाखाचे दागिने लंपास
एसटी प्रवासात शेजारी बसलेल्या महिलेने गुंगी येणारा पेढा खाण्यास देऊन महिलेला गुंगी आल्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन जाऊन त्याठिकाणी एक्सरे काढताना गळ्यातील दागिने काढयला लावत अडीच लाख रुपये किंमतीची बॅग चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सुरेखा सुग्रीव जाधव (वय 50) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
‘अदर पूनावाला यांच्या जीवाला धोका’ Z प्लस सुरक्षा देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
मुंबई – देशात करोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे तातडीने करोना लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. मात्र लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिम रखडली आहे. त्यातच लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टीट्यूटचे अदर पूनावाला यांनी आपल्याला धमक्या मिळत असल्याचे सांगत सुरक्षेसाठी लंडन गाठले आहे. यावरून राजकारण तापलं आहे. यातचआता कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट […]
केंद्राकडून महाराष्ट्रात येणारा 50 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोखला
मुंबई : केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 50 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत होता. कर्नाटकमार्गे महाराष्ट्रात हा साठा येत होता. पण महाराष्ट्रात येणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजन थांबवण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर येतंय. काल रात्री ऑक्सिजन थांबवण्यात आल्याचे वृत्त कळताच गोंधळ निर्माण झालाय. कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केंद्र सरकारला सांगून महाराष्ट्राला होणारा 50 मेट्रीक टन ऑक्सीजन पुरवठा थांबवल्याचे […]