ताज्याघडामोडी

पुढील पाच दिवसात १८ ते ४४ वयोगटासाठी फक्त कासेगाव आरोग्य केंद्रावर होणार लसीकरण 

राज्य शासनाने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागिरकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला खरा पण केंद्र सरकारकडून व लस उत्पादक कंपनीकडून होणारा लसीचा अपुरा पुरवठा आणि दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेले ४५ वयोगटावरील जेष्ठ नागिरक यामुळे राज्य सरकार देखील अडचणीत आले आहे.१८ ते ४४ वयोगटासाठी कोवीन ऍप द्वारे नोंदणी करण्यास २८ एप्रिल पासून सुरवात झाली खरी पण अल्पवधीतच जिल्ह्यातील या साठी नियोजित  लसीकरण केंद्राचे बुकिंग फुल्ल झाले.अशातच कोवॅक्सीन लसीचा पुरवठा मंदावल्यामुळे जिल्हा प्रशासन देखील हतबल ठरले असून आता पंढरपूर तालुक्यासाठी या वयोगटासाठी केवळ १ हजार लसी ८ ते १२ मी या कालावधीत कासेगाव आरोग्य केंद्रावर उपलब्ध होणार असल्याचे आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.       

   १८ ते ४४ वयोगटासाठी नोंदणी सुरु झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील यासाठी निर्धारीत करण्यात आलेल्या काही आरोग्य केंद्रासाठी अनेक नागिरकांनी ऑनलाईन नोंदणी केली होती.मात्र आता पुढील ५ दिवसात केवळ कासेगाव येथील आरोग्य केंद्रासच प्रतिदिन २०० प्रमाणे १ हजार कोवोक्सीन लसीचे डोस मिळणार असल्याने तालुक्यातील इतर आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागिरकांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *