ताज्याघडामोडी

चिंताजनक.. पंढरपूर शहर व तालुक्यात आज आतापर्यंतची उच्चांकी वाढ 

  सोलापूर शहरात कोरोना बाधितांची संख्या घटत चालली असतानाच सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागत मात्र नव्याने पुढे येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.पंढरपुर शहर व तालुक्यात एकाच दिवशी आलेल्या अहवालातील कोरोना बाधितांच्या संख्येने गेल्या सव्वा वर्षातील सर्वाधिक नोंदवली असून त्यामुळे पंढरपुर तालुका हा सोलापूर जिल्ह्याचा हॉटस्पॉट ठरला आहे.                 […]

ताज्याघडामोडी

दोनच दिवसाचा फरक,मंगळवेढयात पॉझिटिव्ह तर पंढरपुरात निगेटीव्ह

देशभरात कोरोना बाबत जशी चर्चा होत आहे तशीच चर्चा कोरोना चाचणीच्या विश्वासाहर्ते बाबतही होत आली आहे.गतवर्षी कोरोनाचे आगमन झाले आणि आरटीपीसीआर हा एकमेव चाचणीचा पर्याय ठरला.आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यास उशीर लागत असल्याने अँटीजेन चाचणीचा पर्याय पुढे आला.पण अँटीजेन चाचणीच्या विश्वासाहर्ते बद्दल अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले आहेत.असाच अनुभव पंढरपुर तालुक्यातील एका इसमास आला असून १७ […]

ताज्याघडामोडी

नितीन गडकरींनी मोदी सरकारला दिला घरचा सल्ला, म्हणाले.

नवी दिल्ली | कोरोना महामारीत देशात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची कमतरता भासत आहे. त्याचबरोबर देशात लसीकरणाचा वेगही मंदावल्याची स्थिती आहे. तर उत्तरेकडील काही राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यावरून आता मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मानले जाणारे मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारला सल्ला दिला आहे. जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्यानं समस्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! विहिरीत कालवले विष, पिण्याच्या पाण्यातही ओतले कीटकनाशक, गुन्हा दाखल

शहापूर तालुक्याच्या मुसईवाडीतील पिण्याच्या पाण्यात अज्ञात व्यक्तींनी कीटकनाशक टाकून पळ काढला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून किन्हवली पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या व्यक्तींचा शोध घेत असून विचित्र घटनेने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. शहापूरच्या ग्रामीण भागात आदिवासी वाड्यातील जनतेला एकीकडे पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत असतानाच दुसरीकडे ऐन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दुहेरी हत्याकांड; शुल्लक भांडणावरुन दोन सख्ख्या भावांची हत्या

बीड : शुल्लक भांडणाच्या कुरापतीवरून झालेल्या भांडणात दोन सख्ख्या भावांची हत्या झाली आहे. या घडनेनं बीडमध्ये खळबळ माजली आहे. बीड शहरापासून जवळच असलेल्या नागापूर या छोट्याशा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणातील आरेापी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जुन्या भांडणाची कुरापत काढत मोबाईलवरून शिवीगाळ करणार्‍या तरूणाच्या घरच्यांना सांगण्यासाठी दोन भाऊ शेतातून गावात […]

ताज्याघडामोडी

स्टेट बँकेने बदलले हे नियम, बँकेत जाण्यापूर्वी आधी हे जरुर जाणून घ्या…

मुंबई : देशात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तथापि लोकांना बँकिंग सेवा उपलब्ध आहेत. दरम्यान, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने आपल्या सेवांविषयी काही बदल केले आहेत. एसबीआयने आता शाखा उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेतही बदल केला आहे. तसेच बँक आता निवडक काम करेल. आता सामान्य कामे केली जाणार नाहीत.  एखादे महत्वाचे काम असेल तरच […]

ताज्याघडामोडी

केजरीवाल सरकारची मोठी घोषणा; कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार, तर मुलांना मोफत शिक्षण

नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. काही रुग्णांना दिल्लीमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यातच, कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढू लागलेला असताना दिल्ली सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जर कुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात येईल. […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरातील 15 खाजगी रुग्णांलयातील 540 बिलांची तपासणी 7 लाख 3 हजार 700 रुपये केले कमी

पंढरपूर(18):- कोरोना बाधित रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये गोरगरीब व गरजू रुग्णांना वाजवी दरात उपचार  मिळावेतयासाठी  शासनाने उपचारासाठी  आकारावयाचे कमाल दर मर्यादा निश्चित केली आहे. अद्यापही काही खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांकडून  निश्चित केलेल्या दरापेक्षा आधिक दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत असल्याने  नियुक्त केलेल्या लेखापरिक्षण पथकामार्फत शहरातील 15 खाजगी रुग्णांलयातील  540  बिलांची तपासणी करुन 7 लाख 3 […]

ताज्याघडामोडी

विनाकारण फिरणाऱ्याला 500 रूपये दंड वापरलेले वाहन पोलीस घेणार ताब्यात

सोलापूर, दि. 18 : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. ब्रेक द चैनअंतर्गत संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्द वगळून जिल्ह्यात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना 500 रूपये दंड आणि वापरत असलेले वाहन लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत ताब्यात घेण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! पेन्शनचे दोन लाख मागितल्याने बापाने केला पोटच्या मुलाचा खून

सेवानिवृत्तीच्या रकमेतून दोन लाखांची मागणी करणाऱ्या मुलास जन्मदात्या बापाने डोक्यात लोखंडी पाइपचा घाव घालून ठार केले. ही घटना रविवारी (दि. १६) सायंकाळी सटाणा रोडवरील एका हॉटेलमध्ये घडली. हितेश कृष्णा बाविस्कर (३४) असे मृताचे नाव असून छावणी पोलिसांनी बापासह इतर दोघांना अटक केली आहे. संशयित पिता कृष्णा पौलद बाविस्कर हा एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होता. […]