ताज्याघडामोडी

नितीन गडकरींनी मोदी सरकारला दिला घरचा सल्ला, म्हणाले.

नवी दिल्ली | कोरोना महामारीत देशात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची कमतरता भासत आहे. त्याचबरोबर देशात लसीकरणाचा वेगही मंदावल्याची स्थिती आहे. तर उत्तरेकडील काही राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यावरून आता मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मानले जाणारे मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारला सल्ला दिला आहे.

जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्यानं समस्या निर्माण होत असेल, तर एका कंपनीला देण्याऐवजी आणखी 10 कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना द्या, असा सल्ला नितीन गडकरी यांनी केंद्राला दिला आहे. लस उत्पादक कंपन्यांना देशात पुरवठा करु द्या आणि जर नंतर जास्त निर्मिती झाल्यास ते निर्यात करु शकतात, हे सर्व 15 ते 20 दिवसात केलं जाऊ शकतं, असं देखील नितीन गडकरी म्हणाले.

मी काही फार महत्त्वाचं काम करत नाही. समाजात माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम करणारे अनेक लोक आहेत. आपले पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी आणि इतर सर्वच सरकारी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. आपणही सर्वांनी सर्व मतभेद विसरून सामाजिक जबाबदारीतून काम करायला हवं, असं नितीन गडकरी म्हणाले होते.

दरम्यान, चंदनऐवजी इथेनॉल, डिझेल आणि बायोगॅस इंधन आणि विजेचा वापर केला गेला तर अंत्यसंस्कार करणं स्वस्त होईल, असा सल्ला नितिन गडकरी यांनी दिला आहे. तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीवर तरंगणाऱ्या शवांबद्दल गडकरींनी प्रधानमंत्री कार्यालयात एक प्रस्ताव देखील मांडला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *