ताज्याघडामोडी

चिंताजनक.. पंढरपूर शहर व तालुक्यात आज आतापर्यंतची उच्चांकी वाढ 

 

सोलापूर शहरात कोरोना बाधितांची संख्या घटत चालली असतानाच सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागत मात्र नव्याने पुढे येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.पंढरपुर शहर व तालुक्यात एकाच दिवशी आलेल्या अहवालातील कोरोना बाधितांच्या संख्येने गेल्या सव्वा वर्षातील सर्वाधिक नोंदवली असून त्यामुळे पंढरपुर तालुका हा सोलापूर जिल्ह्याचा हॉटस्पॉट ठरला आहे.                

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात  ९५ तर  तालुक्याच्या ग्रामीण  भागात ४३६ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *