ताज्याघडामोडी

तुमचा आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर बंद असेल तर खबरदार

मुंबई : तुमच्याकडे जर तुमचा कोणता महत्त्वाचा दस्तावेज मागितला, तर तुम्ही नक्कीच आधारकार्ड पुढे कराल. अशाच महत्त्वाच्या असलेल्या document बद्दल तुम्हाला अनेक प्रश्न असतील, अनेकदा तर तुम्हाला आधारकार्डशी लिंक असलेला तुमचा फोन नंबर सुद्धा आठवत नसेल. किंवा मग तो फोन नंबर हरवला, बदलला किंवा बंद असला तर काय करावे ? हा प्रश्न तुम्हाला नक्कीचं पडत […]

ताज्याघडामोडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा कालावधीत आवश्यक उपाययोजना कराव्यात -प्रांताधिकारी सचिन ढोले   

 पंढरपूर, दि. 16:- माघी यात्रा कालावधीत राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता  आहे. या कालावधीत कोरोना विषाणू ससंर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच  ही वारी सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी संबधित विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना प्रातांधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या माघ वारी नियोजनबाबत सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले […]

ताज्याघडामोडी

बॅंक ऑफ महाराष्ट्र सह चार बँकांचे होणार खाजगीकरण ? 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सरकारी बॅंकांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.ज्या चार बॅंकांची नावे सध्या घेतली जात आहेत, त्यामध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचा समावेश आहे. बॅंकांचे खासगीकरण एप्रिल 2021 ते मार्च 2022 दरम्यान केले जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यानी नाव न […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मिरचीपूड डोळ्यांत फेकून लुटायचे, दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात

सांगली: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. मिरज-म्हैसाळ मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत चार दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर एक दरोडेखोर पसार झाला. त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दरोडेखोरांकडून मिरचीपूड, कोयते, लोखंडी रॉड, हातोडी, मोबाइल जप्त केले आहेत. निमजी इगलिस काळे (वय ६२), परारी उर्फ […]

ताज्याघडामोडी

मंत्रालयासमोर विष पिऊन छावा संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अखेर आज जालना जिल्ह्यातील छावा संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या पाचही आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर सर्व आंदोलकांना मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या आंदोलकांनी पोलीस प्रशासन आपल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत तरुणीनं वकिलालाच मागितली खंडणी

जळगाव, 15 फेब्रुवारी : वकील माणसांना गुन्हेगारी प्रकरणांतून बाहेर काढत न्याय मिळवून देतात. मात्र इथं वकिलालाच जाळ्यात अडकवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. जळगाव शहरात हा प्रकार घडला आहे. एका तरुणीनं वकिलाकडे खंडणी मागितली आहे. तिनं वकिलाला आधी फेसबुक रिक्वेस्ट पाठवली. त्यानं ती स्वीकारल्यावर तरुणीनं वकीलाला आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला. त्याच्याकडे ऑनलाईन खंडणी मागितली. याप्रकरणात गणेश कॉलनी […]

ताज्याघडामोडी

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ

पेट्रोल- डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून आता 50 रुपयांची वाढ एलपीजीच्या दरात करण्यात आल्यामुळे 14 किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी ग्राहकांना आता 769 रुपये मोजावे लागणार आहे. हे नवीन दर आज (15 फेब्रुवारी) दुपारी 12 पासून लागू होणार आहे.

ताज्याघडामोडी

पंढरपूर नगरपरिषदे समोर खोकेधारकांचे बुधवारी धरणे आंदोलन पंढरीतील ते बसलेले व्यवसाय मोडीत काढनारी ती निविदा रद्द करा

पंढरपूर :प्रतिनिधी पंढरपूर नगरपरिषदेने नुकतीच जाहीर केलेली जा.क्र./पंनपं/नअ/ ४३२/२०२१ दि ०९/०२/२०२१ ही निविदा ही निविदा म्हणजे बसलेले व्यवसाय मोडीत काढून खर्च करणाऱ्यावर अन्याय करणारी निविदा आहे. तरी ती निविदा रद्द करावी अन्यथा येत्या बुधवार दि17 फेब्रुवारीधरणे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा खोकिधरक यांनी दिला आहे. या काढण्यात आलेल्या निविदामध्ये पंढरपूर शहरातील सि. स. नं. ३६९२ […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भीषण अपघात टेम्पो पलटून 16 जणांचा मृत्यू

जळगावात भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यात आभोडा येथील 12 , केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला, ज्यात 16 जणांचा […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी व डॉक्टर सेल यांच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर

पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले. या शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवून आपल्या आरोग्य वरील समस्यांबाबत एच बी तपासणी हिमोग्लोबिनची तपासणी हाडांचा ठिसूळपणा मणक्याचे आजार डोळे तपासणी आदींबाबत तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येत असल्याने महिलांना या आरोग्य शिबिराचा […]