ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी व डॉक्टर सेल यांच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर

पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले.
या शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवून आपल्या आरोग्य वरील समस्यांबाबत एच बी तपासणी हिमोग्लोबिनची तपासणी हाडांचा ठिसूळपणा मणक्याचे आजार डोळे तपासणी आदींबाबत तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येत असल्याने महिलांना या आरोग्य शिबिराचा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून केले केले.
खा.सुप्रियाताई सुळे व महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचे सकल्पनेतून साकारलेल्या या आरोग्य शिबिराचे उद्घाटन
प्रारंभी प्रणिताताई भालके यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार,जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात,प्रदेश सचिव अरुण आसबे, श्रीकांत शिंदे, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी, काँग्रेसचे ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मधुकर फलटणकर, युवराज भोसले,मुन्ना भोसले, रशीद शेख, शहर सचिव विजय काळे, ओबीसी सेलचे शहर कार्याध्यक्ष मनोज आदलिंगे निलेश कोरके, राकेश साळुंके , सागर पडगळ आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी उपस्थित तज्ञ डॉक्टर्स नेत्ररोग तज्ञ डॉ मनोज भायगुडे, महिला तज्ञ डॉ दीपाश्री घाडगे, डॉ. दत्ता साळुंखे, डॉ.अर्चना शेडगे या डॉक्टर कडून 230 माहिलांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आला.
हे आरोग्य शिबिर यशस्वी करणेकामी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अमरजीत गोडसे, डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉ संदिप शेंडगे,किशोर कवडे व राष्ट्रवादी काँग्रेस
महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अनिता पवार शहराध्यक्षा संगीता माने,कार्याध्यक्षा सुनंदा उमाटे,शहर उपाध्यक्षा सुनिता शेजवळ राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी जिल्हा संघटक राधा मलपे यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.प्रारंभी डॉ.गोडसे यांनी प्रास्ताविकातून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची रुपरेषा थोडक्यात सांगितली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन विजय काळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *