ताज्याघडामोडी

अखेर एसटी कर्मचारी संपावर तोडगा निघाला! परिवहन मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा!

गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा मुद्दा राज्यात चर्चेचा ठरला होता. या मुद्द्यावरून विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारवर टीका करायला सुरुवात केली होती. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाचा देखील राज्य सरकारला सामना करावा लागत होता. इतर मागण्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं, ही प्रमुख मागणी केली होती. त्यानंतर आज दिवसभर बैठकांचं […]

ताज्याघडामोडी

24 तासांत कामावर हजर व्हा; अन्यथा सेवा समाप्त, एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटीस

एसटी कर्मचाऱयांचा संप मोडून काढण्यासाठी आता एसटी महामंडळ सरसावले आहे. एसटी महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या 300 ते 350 कामगारांना सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कामगारांनी 24 तासांच्या आत नोकरीवर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता आपली तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक रद्द करण्यात येईल असे या नोटिसीत म्हटले आहे. मंगळवारी एसटी महामंडळाचे […]

ताज्याघडामोडी

एसटी संपावर आज न्यायालयात सुनावणी, 3987 कर्मचारी कामावर रुजू

एसटी महामंडळाच्या संपाची काडी फुटण्यास सुरुवात झाली असून रविवारी 3987 कर्मचारी कामावर हजर झाले. तसेच राज्याच्या विविध भागांतून रविवारी 79 बसेस चालविण्यात आल्या असून त्यातून 1746 प्रवाशांनी प्रवास केला. गेले 18 दिवस एसटी कामगारांचा संप सुरू असून सोमवारी या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याची मागणी करीत गेले अनेक दिवस एसटी […]

ताज्याघडामोडी

मंत्रालयाच्या दारात एसटीच्या महिला कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्रालयासमोर एसटी कर्मचारी असलेल्या एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.13 दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. मुंबई येथील मंत्रालयासमोर काही कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. आत्मदहनाचा प्रयत्न झाल्यावर पोलिसांनी त्या महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला.’आम्ही तुमच्या पाया पडतो. आमच्या मागण्या मान्य […]

ताज्याघडामोडी

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता

शासनामध्ये विलीन करण्यासाठी गेले काही दिवस संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब  यांनी मोठा दिलासा दिला आहे. एसटी कामगारांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीचा अभ्यास करून शासन सकारात्मक निर्णय घेईल. तसेच विलिनीकरणासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीला आपला अहवाल लवकर देण्याबाबत सांगण्यात येईल, असे आश्वासन परब यांनी […]

ताज्याघडामोडी

राज्यातील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या व प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. तर, हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटी वाहतुक ठप्प झाली असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका […]

ताज्याघडामोडी

राज्य सरकारचा मोठा निर्णय, खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी, मात्र प्रवाशांची लूट

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने खासगी प्रवासी बस, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र खासगी वाहतूक करणारे अव्वाच्या सव्वा दर आकारत असून प्रवाशांची अक्षरशः लूट केली जात आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त […]

ताज्याघडामोडी

एसटी कामगारांना मोठा दिलासा! महामंडळाला तातडीने 500 कोटी

  एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्‍यक बाबींसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. हा निधी तातडीने वितरीत करण्यात आला आहे.चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरीत केला असून उर्वरीत 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, […]

ताज्याघडामोडी

धक्कादायक ! एसटी महामंडळाच्या महिला वाहकाच्या हातातच तिकीट मशीनचा स्फोट

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे स्फोट होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी कानातच ब्लुटुथ हे़डफोनचा स्फोट झाल्याची घटना ताजी असताना आता एसटी महामंडळाच्या बसमध्ये वापरण्यात येणाऱ्या तिकीट व्हेंडींग मशीनचा स्फोट झाला. ही घटना गोंदियात घडली आहे. गोंदिया बसस्थानकात एका महिला वाहकाच्या हातात तिकीट व्हेंडींग मशीनचा स्फोट झाला. यामध्ये महिला वाहक गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे एकच […]

ताज्याघडामोडी

राज्यात एसटी चालू राहणार, पण तुम्हाला प्रवास करता येणार का? जाणून घ्या

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा बुधवारी करण्यात आलीय. राज्याच्या मुख्य सचिवांनी त्याबाबत एक परिपत्रक काढून गुरुवारी म्हणजे आज रात्रीपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याची माहिती दिलीय. त्यासाठी कठोर नियमावलीही तयार करण्यात आलीय. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतुकीबद्दल कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यात आता एसटी महामंडळासाठी एक नियमावली परिवहन […]