ताज्याघडामोडी

धक्कादायक ! एसटी महामंडळाच्या महिला वाहकाच्या हातातच तिकीट मशीनचा स्फोट

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे स्फोट होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी कानातच ब्लुटुथ हे़डफोनचा स्फोट झाल्याची घटना ताजी असताना आता एसटी महामंडळाच्या बसमध्ये वापरण्यात येणाऱ्या तिकीट व्हेंडींग मशीनचा स्फोट झाला.

ही घटना गोंदियात घडली आहे.

गोंदिया बसस्थानकात एका महिला वाहकाच्या हातात तिकीट व्हेंडींग मशीनचा स्फोट झाला. यामध्ये महिला वाहक गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या आहेरी आगारातून आलेल्या बसमधील वाहक कल्पना मेश्राम परतीच्या प्रवासासाठी ईटीआयएम मशीनमध्ये रुट बदलत होत्या. त्याचवेळी तिकीट मशीनचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात कल्पना मेश्राम यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

या घटनेनंतर कल्पना मेश्राम यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तिकीट मशीन पुरविणाऱ्या ट्रायमॅक्स कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे मंडळाच्या कारभारावर बोट ठेवण्यात आलं आहे. मशिनमधून प्रिंट येत नाही, तिकीट न निघणे, अचानक मशिम बंद पडणे आणि आउटडेटेड मशिनमुळेच ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. दरम्यान मशिन ओव्हर हिट झाल्यामुळे स्फोट झाल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *