प्रांताधिकारी गजानन गुरव यांची माहिती पंढरपूर, दि. 25 :- तालुक्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून कोरोना बाधितांचा शोध घेतला जाणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणाऱ्या 21 गावांत 14 दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच ज्या गावांत 10 किंवा 10 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण […]
Tag: #corona
पुढील महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार
नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी केंद्र सरकारा सुचना देत सांगितले की, सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका जाणवतोय. यात गंभीर आणि मध्यम लक्षणे असलेल्या २० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते, तर तिसऱ्या लाटेदरम्यान दिवसाला ४ ते ५ लाख जणांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. प्रत्येकी १०० कोरोनाबाधित रुग्णांपैकी २३ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल […]
महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर
केंद्र आणि राज्य सरकारे संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कंबर कसत असले तरी तज्ज्ञांच्या मते देशात तिसरी लाट येण्याची शक्यता कमी होते आहे.जरी ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेप्रमाणे विनाशकारी आणि प्राणघातक असणार नाही. केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने मात्र यावर टिप्पणी करणे टाळले आहे. पण, काही सदस्यांनी सांगितले की, तिसरी लाट येऊ शकत नाही. […]
भारतात झायडस कॅडिलाच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी DCGI ची मंजुरी
देशातील आघाडीची औषध निमिर्ती कंपनी झायडस कॅडिलाच्या ZyCoV-D या लसीला अखेर औषध महानियंत्रक अर्थात डीसीजीआयने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ZyCoV-D लसीने सुरक्षिततेचे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे डीजीसीआयने हा निर्णय घेतला आहे. ही लस पूर्णपणे स्वदेशी असून डीएनएवर आधरित असणारी जगातील पहिली लस आहे. देशात आणखी एक लस उपलब्ध झाल्यामुळे आता लसीकरणाला गती येण्याची शक्यता […]
भारतात लहान मुलांसाठी येणार आणखी एक लस
जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी लसीच्या चाचणीची परवानगी मागितली आहे.देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करताना तज्ज्ञांनी यामध्ये मुलांसाठी धोक्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आता लहान मुलांसाठी आणखी एक लस लवकरच येण्याची शक्यता आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी लसीच्या चाचणीची परवानगी मागितली आहे. […]
राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले.
कोरोनामुळे सगळ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खूप परिणाम झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करता शाळा, महाविद्यालय कधी सुरु होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता राज्यातील शाळा उघडण्याबाबत राजेश टोपे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश […]
कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी
देशातून अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत देशातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस द्यावा का हा प्रश्न उपस्थित होतोय. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता नसल्याचं म्हटलंय. WHOने बुधवारी म्हटलं की, सर्वप्रथम आपल्याला जगातील गरीब देशांना […]
ग्रामीण भागांमध्ये करोनाच्या चाचण्यांचा वेग कमी
करोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असला तरीही तो नियंत्रणात ठेवण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या नियमित स्वरूपामध्ये करणे गरजेचे आहे. मात्र आरोग्यव्यवस्था सक्षम नसलेल्या ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी या चाचण्यांचा वेग कमी झाला आहे.मागील दीड वर्षांपासून सातत्याने जनजागृती करूनही सर्वसामान्यांमध्ये अपेक्षित जनजागृती झाली नसल्याची खंत राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये कार्यरत असलेले आरोग्य कार्यकर्ते सुधीर मोहिते यांनी व्यक्त केली. करोना […]
भारतामध्ये आढळून आल्या कोव्हिशिल्डच्या बनावट लसी; WHO आणि सीरमकडून दुजोरा
सध्या देशभरात व्यापक लसीकरणाची मोहीम राबवली जात असून १८ वर्षावरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, मॉडर्ना, स्पुटनिक व्ही आणि नुकतीच परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन या लसी भारतीयांना दिल्या जात आहेत.नागरिकांमध्ये या पार्श्वभूमीवर दिलासा मिळाल्याची भावना असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने एका गंभीर गोष्टीकडे संपूर्ण जगाचे आणि विशेषत: भारताचे लक्ष वेधले आहे. […]
दिलासादायक बातमी! राज्यात रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांच्या आसपास
महाराष्ट्रात आज ५,८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६१,९५,७४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ % एवढे झाले आहे. आज राज्यात ४,५०५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ६८ कोरोना बाधित रुग्णांच्या […]