ताज्याघडामोडी

दिलासादायक बातमी! राज्यात रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांच्या आसपास

महाराष्ट्रात आज ५,८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६१,९५,७४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ % एवढे झाले आहे.

आज राज्यात ४,५०५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ६८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,११,११,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,९६,८०५ (१२.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात ३,५३,१२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,५३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *