ताज्याघडामोडी

पुढील महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार

नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी केंद्र सरकारा सुचना देत सांगितले की, सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका जाणवतोय. यात गंभीर आणि मध्यम लक्षणे असलेल्या २० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते, तर तिसऱ्या लाटेदरम्यान दिवसाला ४ ते ५ लाख जणांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. प्रत्येकी १०० कोरोनाबाधित रुग्णांपैकी २३ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. यासाठी पुढील महिन्यात २ लाख आयसीयू बेडची गरज भासू शकते. त्यामुळे व्हेंटिलेटरसह १.२ लाख आयसीयू बेड, ७ लाख नॉन-आयसीयू बेड तयार ठेवावेत असा सुचना त्यांनी दिल्या आहेत.

कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार अशी शक्यता वर्तवली जाते. डेल्टा व्हेरियंटचे जगभरात आत्तापर्यंत १३ म्युटेशन झाले आहेत. यातील पाच प्रकार भारतात आढळतात. यात कोरोना विषाणूवर अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये ७२ हजार ९३१ नमुन्यांचे जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आले. त्यापैकी ३० हजार २३० मध्ये कोरोनाचे गंभीर प्रकार आढळले. तर २० हजार ३२४ नमुन्यांमध्ये डेल्टा प्रकार सापडला आहेत त्य़ामुळे तिसऱ्या लाटेची भीती अद्याप कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *