ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर

केंद्र आणि राज्य सरकारे संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कंबर कसत असले तरी तज्ज्ञांच्या मते देशात तिसरी लाट येण्याची शक्यता कमी होते आहे.जरी ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेप्रमाणे विनाशकारी आणि प्राणघातक असणार नाही.

केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने मात्र यावर टिप्पणी करणे टाळले आहे. पण, काही सदस्यांनी सांगितले की, तिसरी लाट येऊ शकत नाही. जरी आली तरी ती मोठ्या प्रमाणात पसरणार नाही.

टास्क फोर्सच्या ज्येष्ठ सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, नवे रुग्ण कमी होत आहेत. ऑगस्टच्या अखेरपर्यंत महाराष्ट्र आणि केरळातही रुग्ण वेगाने कमी होऊ शकतात. तुरळक राज्य वगळता बहुतांश राज्यात आज मृत्यू होत नाहीत. ऑगस्ट अखेरपर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारपर्यंत कमी होऊ शकते. ऑगस्ट अखेरपर्यंत लसीकरण ६५ कोटींपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे मृत्यू व हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासून बचाव होऊ शकतो. इंडियन सार्स- कोविड २ जीनोमिक्स कन्सोर्टियमचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा ‘लोकमत’कडे म्हणाले की, आणखी तीन आठवडे थांबा म्हणजे, तिसऱ्या लाटेबाबत मी वास्तविक टिप्पणी करू शकेल.

आणखी एक लाट येणार की, नाही हे जाणून घेण्याची निश्चित अशी पद्धत नाही. मात्र, दुसऱ्या लाटेइतकी ती त्रासदायक नसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *