जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी लसीच्या चाचणीची परवानगी मागितली आहे.देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करताना तज्ज्ञांनी यामध्ये मुलांसाठी धोक्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, आता लहान मुलांसाठी आणखी एक लस लवकरच येण्याची शक्यता आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी लसीच्या चाचणीची परवानगी मागितली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी नुकतंच मुलांसाठी तयार करण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीवर संशोधनाचा अहवाल पुढच्या महिन्यात येईल अशी माहिती दिली होती. त्यानंतर आता जॉन्सनने लशीच्या चाचणीसाठी मागितलेल्या परवानगीमुळे आशा निर्माण झाल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी म्हटलं होतं की, लवकरच लहान मुलांसाठीची लस उपलब्ध होऊ शकते. तसंच एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं होतं की, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे 2 ते 18 वर्षे वयोगटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातीच चाचणीचे निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत समोर येतील.