करोना रुग्णसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउन निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधी अंतिम निर्णय घेणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी दोन दिवसांत लोकलसंबंधी निर्णय घेऊ शकतो असंही म्हटलं आहे. “११ […]
Tag: #MAHARASHTRA
लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
राज्यामध्ये कोरोनाचं प्रमाण दुसऱ्या लाटेत कमी होत असल्याचं चित्र असलं तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काळजी घेतली जात आहे. राज्यात कोरोनासंबंधी अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. हे निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरण आणि राज्य सरकारची तयारी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आपण […]
राज्यमंत्रिमंडळात मोठा बदल होणार?
राज्यमंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारावर डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर एका राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून नारळ मिळण्याची शक्यता असून यातील एक मंत्री आदिवासी भागातील असून दुसरा मुंबईतील असल्याचं सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसपूस […]
महाराष्ट्रावरचं मोठं संकट टळलं, राजेश टोपेंनी दिली दिलासादायक बातमी!
कोरोनाच्या लाटेतून महाराष्ट्र पुन्हा एकदा कुठे सावरत आहे. त्यातच मागील महिन्यात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटनं थैमान घातले होते. पण आता राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण आढळलेला नाही’ अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यावर समोरील मोठे संकट तुर्तास टळले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात […]
उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री
शिवसेना पक्षप्रमुखपदासोबत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे. याची पोचपावती जनतेनेच दिली आहे. प्रश्नमने 13 राज्यात केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे. प्रश्नमने आपल्या या सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीत 13 राज्यांची निवड केली होती. ज्यात बिहार, गोवा, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगना, […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा आदेश
मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (सोमवार) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्सची स्थापन करावी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे असे निर्देश दिले. कोरोनाकाळात देखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये, या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोरोना काळात उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार […]
उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार?
मुंबई: राज्याचे विशेष सरकारी वकील अॅ. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अॅ.उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अॅ. उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद […]
राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील निवडणूका स्थगित
मुंबई: अद्याप पूर्णपणे कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली नसतानाच तिसऱ्या लाटेचा आणि डेल्टा प्लसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्यामुळे राज्यातील ५ जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आहे. त्या टप्प्यावर राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. […]
महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश
केंद्रीय मंत्रीमंडळाचा आज (बुधवार ७ जुलै २०२१) विस्तार होणार आहे. एएनआयच्या वृत्तानुसार ४३ नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे. शपथविधी आज संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवन येथे होईल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे खासदार नारायण राणे यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. नारायण राणे यांच्यासह भागवत कराड, कपिल पाटील या महाराष्ट्रातील भाजप खासदारांचा केंद्रीय मंत्रीमंडळात […]
राज्यात कोराना रुग्णसंख्येत घट, पहा दिवसभरात किती नवे रुग्ण?
मुंबई : राज्यात आज (28 जून) कोरोना आकडेवारी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 9 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत होते. पण यामध्ये आता घट झालेली आहे. त्यामुळे राज्याला थोड्या प्रमाणात काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 6 हजार 727 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आजची आकडेवारी ही कालच्या तुलनेत 2 […]