ताज्याघडामोडी

कोविशिल्ड लस झाली आणखी स्वस्त

पुणे | सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लशीची किंमत आणखी कमी केली आहे. सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्या कोरोना लशीची नवी किंमत जारी केली आहे. राज्य सरकारला कमीत कमी दरात ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविशिल्ड कोरोना लशीची सुरुवातीची किंमत प्रति डोस राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये होती. राज्य […]

ताज्याघडामोडी

आमदारालाच 24 तास मिळाला नाही ICU बेड; कोरोनाने झाला मृत्यू

लखनऊ, 28 एप्रिल : देशातील कोरोना परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की अगदी सत्ताधारी पक्षातील आमदारालाही ICU बेड मिळाला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीतील भाजप आमदार केसर सिंह गंगवार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केसर सिंह गंगवार बरेलीतल्या नवाबगंजमधील आमदार. 18 एप्रिलला ते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. […]

ताज्याघडामोडी

लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

बीड, 28 एप्रिल: बीड जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता जिल्ह्यातील नागरिक लस घेण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. मात्र लसीचा तुटवडा असल्याने आज जिल्ह्यात केवळ तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु होते अन्य 127 लसीकरण केंद्र लसी अभावी बंद करावे लागले. आज सकाळी आरोग्य विभागाकडे केवळ 2600 लसींचे डोस उपलब्ध होते. दुपारपर्यंत […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरातही होणार कोरोना रुग्णांना आकारण्यात आलेल्या बिलांची पडताळणी

कोरोना रुग्णांवर ज्या खासगी रुग्णालयांत उपचार होत आहे अशा काही रुग्णांलयांनी शासनाने निर्देशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लावून बिलाची आकारणी केल्यास सदर बिलांची पडताळणी करण्यात येणार असून यासाठी प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याशी संपर्क केला असता कोविड हॉस्पिटल कडून कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आकारण्यात येणाऱ्या बिलांची पडताळणी करण्यासाठी संजय सदावर्ते यांच्यासह ५ जणांची विशेष समिती स्थापित केल्याचे सांगितले.  […]

ताज्याघडामोडी

राज्यात कडक निर्बंध 10 दिवस वाढणार?

मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आणखी दहा दिवस लॉकडाऊन वाढवावा, असा सूर मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी मंगळवारी बैठकीत लावला. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी शिक्कामोर्तब केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. तसेच सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पुन्हा तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत, त्यामुळे आपल्याला पूर्ण तयारी करून घ्यावीच लागेल, […]

ताज्याघडामोडी

ना रेमडेसिवीर ना व्हेंटिलेटर तरीही वृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात

विंचूर : कोरोनाची बाधा झाल्यावर अऩेकजणांची भीतीने तारांबळ उडते. मात्र, मानसिक स्वास्थाच्या बळावर अनेकजण कोरोनामुक्त झाल्याची उदाहरणे ताजी असतानाच निफाड तालुक्यातील चांगदेवराव शिंदे (७२) व त्यांच्या पत्नी गयाबाई शिंदे (६६) या शेतकरी दाम्पत्याने चौदा व सोळा स्कोअर पातळी असताना घरच्या घरी उपचार करून कोरोना आजाराने खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला दिला आहे. निफाड […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोरोनामुळे भाजप नगरसेविकेच्या भावाचे निधन, बहिणीने हॉस्पिटलमध्ये केली तोडफोड!

नाशिक, 27 एप्रिल : नाशिकमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्यसह राजकीय लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. नाशिकमध्ये सर्वात तरुण नगरसेविका ओळख असलेल्या प्रियंका घाटे यांच्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रियंका घाटे आणि त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये राडा घातला. भाजप नगरसेविका प्रियंका घाटे यांचा भाऊ रोशन घाटे याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे […]

ताज्याघडामोडी

1 मेपासून होणाऱ्या 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहीमवर प्रश्नचिन्ह

मुंबई : येत्या 1 मे पासून देशात 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही 1 मे पासून व्यापक लसीकरणाची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता या लसीकरणाच्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभारण्याची शक्यता आहे. कारण राज्याला लोकसंख्येच्या प्रमाणात लसीच उपलब्ध झाल्या नसल्याचं स्पष्ट झालं आहे.  देशात उपलब्ध असलेल्या तिन्ही लसी या मे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांवर दाखल होणार गुन्हे

नाशिक, 27 एप्रिल: राज्यातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. अशावेळी कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरता विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या शहारांभोवती कोरोनाची विळखा अधिक आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन देखील लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीत नाशिकमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची संख्या कमी […]

ताज्याघडामोडी

राज्यात गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. […]