ताज्याघडामोडी

लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

बीड, 28 एप्रिल: बीड जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता जिल्ह्यातील नागरिक लस घेण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. मात्र लसीचा तुटवडा असल्याने आज जिल्ह्यात केवळ तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु होते अन्य 127 लसीकरण केंद्र लसी अभावी बंद करावे लागले. आज सकाळी आरोग्य विभागाकडे केवळ 2600 लसींचे डोस उपलब्ध होते. दुपारपर्यंत ते सर्व पुरतील एव्हढेच होते तसेच लस केव्हा येणार याबाबत अधिकृतपणे आरोग्य विभागालाही माहिती नाही. लस घेण्यासाठी बीडमधील येळंब घाट येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

1 मे पासून राज्यात 18 वर्षांपुढील नागरिकांनी लस द्यायची या बाबतीत घोषणा झाली. मात्र लसीच्या तुटवडा यामुळे 45वर्षा वरील नागरिकांचे लसीकरण आद्याप पूर्ण लसीकरण झाले नाही. 24 एप्रिल रोजी बीड जिल्ह्यासाठी 15 हजार कोविशिल्ड तर कोव्हॅक्सीन 2 हजार 620 लसीची उपलब्धता आरोग्य विभागाला झाली होती .

गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यातल्या विविध लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू होते. मात्र आज कोविशिल्ड लस संपल्यामुळे जिल्ह्यातील 3 केंद्रावर लसीकरण सुरू आहे. यामध्ये जिल्हा रूग्णालय, येळंबघाट आणि बीड शहरातील अन्य एका केंद्रावर सुरू आहे. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी आता शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारत आहेत. मात्र लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना लस मिळत नाही त्यामुळे ठिकठिकाणच्या केंद्रावर आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांत वादावाद होतांना दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *