पुणे | सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लशीची किंमत आणखी कमी केली आहे. सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्या कोरोना लशीची नवी किंमत जारी केली आहे. राज्य सरकारला कमीत कमी दरात ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोविशिल्ड कोरोना लशीची सुरुवातीची किंमत प्रति डोस राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये होती. राज्य सरकारसाठी सीरमने आपले दर कमी केले आहेत. राज्य सरकारला ही लस आता 400 ऐवजी 300 रुपयांना दिली जाणार आहे. म्हणजे 100 रुपयांनी ही किंमत कमी करण्यात आली आहे. अदर पूनावाला यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
राज्य सरकारसाठी कोरोना लशीची किंमत प्रति डोस 400 रुपयांवरून 300 रुपये करण्यात आल आहे.
ही किंमत तात्काळ लागू आहे. यामुळे राज्य सरकारचा हजारो कोटी रुपयांची बचत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण होईल आणि अनेकांचा जीव वाचेल, असं अदर पूनावाला यांनी सांगितलं.
दरम्यान, इतर देशांच्या तुलनेत कोविशिल्ड लस खूपच स्वस्त आहे. अमेरिकेतील कोरोना लशीचा एक डोस 1500, तर रशिया आणि चीनमधील कोरोना लशीचा एक डोस 750 रुपयांना आहे. त्या तुलनेत भारतातील कोरोना लस खूपच कमी किमतीत उपलब्ध आहे, असं पूनावाला यांनी यापूर्वी सांगितलं होतं.





