मुंबई, 12 मे: राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, असे असतानाही काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळेच राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. सध्या ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम […]
Tag: #corona
सात दिवसात कोरोना बरा, असा दावा करणाऱ्या कंपनीने जाहीर केली औषधाची किंमत, जाणून घ्या
नवी दिल्ली | कोरोनाने सर्व देशभरात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारीही कमी-अधिक प्रमाणात वाढत आहे. महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना वाढत असताना ऑक्सिजन, रेमडेसीविरचा तुटवडा असल्यानेही अनेकजण दगावले. त्यामुळे केंद्र सरकार शरीरातील ऑक्सिजनची कमतरता भरून निघेल या औषधांवर भर दिला आहे. अशातच झायडस कॅडिलाचं विराफिन हे हे अँटिव्हायरल औषध उपलब्ध […]
महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; आज 71,966 रुग्णांची कोरोनावर मात
मुंबई, 11 मे: महाराष्ट्राची (Maharashtra) वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने होत असल्याचं दिसत आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (Corona) बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं दिसत आहे. आज राज्यात 71,966 रुग्ण कोरोनामुक्त (71,966 discharged today) झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 45,41,391 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.67 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 40,956 नवीन रुग्णांचे […]
राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊनची शक्यता; काही बाबी शिथिलही केल्या जाण्याचे संकेत
मुंबई, दि. 11 – राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही लस आणि अन्य आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लॉकडाउन 31 मेपर्यंत वाढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले असून, ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता असली तरी त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. […]
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण रखडणार; राजेश टोपेंनी मांडली वस्तुस्थिती
देशात लशींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, महाराष्ट्रासह विविध राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला खिळ बसली आहे. महाराष्ट्रात ४५ वर्षांपुढील आणि १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण सुरू आहे. मात्र, लशींचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मंदावण्याची शक्यता आहे. कारण या वयोगटातील लसी ४५ वर्षांपुढील गटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्य […]
देश पुन्हा हादरला! ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने 22 हून अधिक रुग्णांचा तडफडून मृत्यू
आंध्रप्रदेश, 10 मे : आंध्रप्रदेशातील एका रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे देश पुन्हा हादरला आहे. आंध्रप्रदेशच्या तिरुपती येथील रुईया रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते. दरम्यान अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानेही ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदात वर्तविण्यात […]
खरचं लसीकरणानंतर कोरोनाची लागण होते का? यावर केंद्र सरकारनेच दिले स्पष्टीकरण
नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात अक्षरशः थैमान घातलेले आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे अनेकांमध्ये जाणवू लागली आहे. दरम्यान या कोरोनाविरोधातील लढाईत आता लसीकरण मोहिमेने वेग धरला आहे. आत्तापर्यंत देशातील १३ कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. परंतु या लसीकरणानंतरही काहींना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे खरच लसीकरणानंतर कोरोनाची […]
रुग्णालयाला कोरोनाने ग्रासलं; 80 जणांना संसर्ग, 27 वर्षे सेवा देणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरचा मृत्यू
नवी दिल्ली, 10 मे : कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि बाकी मेडिकल स्टॉफला संसर्ग होण्याच्या आणि अनेकांचा जीव गेल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. देशातील अनेक भागातून फ्रंट लाइन वर्कर्सच्या मृत्यूची बातमी येत असते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर ही स्थिती अधिक बिघडली आहे. अनेक रुग्णालयात तर स्टाफचे अनेक सदस्य एकत्रितपणे पॉझिटिव्ह आले […]
आठ ते दहा दिवसांत स्पुटनिक व्ही लस बाजारात विक्रीला
रशियन कोरोना लस वापरण्यासाठी आपत्कालीन मंजुरी मिळाल्यानंतर डॉ. रेड्डीज लॅबने रशियाची स्पुटनिक-व्ही लस आयात केली आहे. लसीचे दीड लाख डोस हिंदुस्थानात पोहोचले आहेत. मात्र अजूनही लस बाजारात यायला आठ ते दहा दिवस लागतील. तिच्या एका डोसची हिंदुस्थानातील किंमत 300 ते 600 रुपयांदरम्यान असू शकते. स्पुटनिक-व्हीचे नमुने तपासणीसाठी हिमाचल प्रदेशातील कसौली येथील केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात […]
कोरोना रूग्णाचा मृतदेह प्लॅस्टिकमधून काढून लोकांनी केला ‘दफन’
राजस्थानच्या सीकर जिल्ह्याच्या एका गावात एका कोविड पीडित व्यक्तीचा मृतदेह कथित प्रकारे दफन केल्यानंतर सुमारे 21 लोकांनी आपला जीव गमावला, या व्यक्तीचा मृतदेह कोणत्याही कोविड प्रोटोकॉलचे पालन न करता गुजरातहून आणला गेला होता. राजस्थान काँग्रेस प्रमुख आणि राज्याचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा यांच्या विधानसभा मतदार संघातील सीकरच्या खीरवा गावात ही घटना घडली आहे. अधिकार्यांनी […]