रशियन कोरोना लस वापरण्यासाठी आपत्कालीन मंजुरी मिळाल्यानंतर डॉ. रेड्डीज लॅबने रशियाची स्पुटनिक-व्ही लस आयात केली आहे. लसीचे दीड लाख डोस हिंदुस्थानात पोहोचले आहेत. मात्र अजूनही लस बाजारात यायला आठ ते दहा दिवस लागतील. तिच्या एका डोसची हिंदुस्थानातील किंमत 300 ते 600 रुपयांदरम्यान असू शकते. स्पुटनिक-व्हीचे नमुने तपासणीसाठी हिमाचल प्रदेशातील कसौली येथील केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी कमीत कमी आठ दिवस तरी लागतील. तपासणीत पात्र ठरल्यानंतर ती खुल्या बाजारात विकण्याची परवानगी दिली जाईल.





