ताज्याघडामोडी

कोरोना रूग्णाचा मृतदेह प्लॅस्टिकमधून काढून लोकांनी केला ‘दफन’

राजस्थानच्या सीकर जिल्ह्याच्या एका गावात एका कोविड पीडित व्यक्तीचा मृतदेह कथित प्रकारे दफन केल्यानंतर सुमारे 21 लोकांनी आपला जीव गमावला, या व्यक्तीचा मृतदेह कोणत्याही कोविड प्रोटोकॉलचे पालन न करता गुजरातहून आणला गेला होता. राजस्थान काँग्रेस प्रमुख आणि राज्याचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा यांच्या विधानसभा मतदार संघातील सीकरच्या खीरवा गावात ही घटना घडली आहे.

अधिकार्‍यांनी म्हटले की, मृतदेह गुजराहून आणण्यात आला होता आणि गावात अंत्यसंस्काराला गेल्यानंतर मृतदेहाच्या संपर्कात आलेल्या सुमारे 21 लोकांचा जीव गेला. अधिकार्‍यांनुसार, कोविड पीडित संक्रमिताचा मृतदेह 21 एप्रिलला गावात आणण्यात आला होता आणि 100 पेक्षा जास्त लोक अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते, यावेळी कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कोणतेही पालन करण्यात आले नाही.

सामुदायिक प्रसाराचा तपास

अधिकार्‍यांनी सांगितले की, मृतदेह प्लॅस्टिकमधून बाहेर काढण्यात आला. मात्र, आश्चर्य म्हणजे लक्ष्मणगढचे उप-विभागीय अधिकारी कुलराज मीना यांनी म्हटले 21 मृत्यूंपैकी कोविड-19 मुळे केवळ 3-4 मृत्यू झाले. इतरांचा मृत्यू वृद्धावस्थेमुळे झाला. आम्ही 147 कुटुंबांचे नमूने घेतले आहेत, जिथे मृत्यू झाले. तपास केला जात आहे की हे प्रकरण सामुदायिक प्रसाराचे आहे किंवा नाही.

गावाला केले सॅनिटाइज

मीन आणि इतर अधिकार्‍यांनी एका वैद्यकीय पथकासोबत रिपोर्ट केल्यानंतर गावाचा दौरा केला, ज्यात गावात तात्काळ स्वच्छता करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मेडिकल किट देण्यात आले. शिवाय गाव सॅनिटाइज करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *