देशातील आघाडीची औषध निमिर्ती कंपनी झायडस कॅडिलाच्या ZyCoV-D या लसीला अखेर औषध महानियंत्रक अर्थात डीसीजीआयने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ZyCoV-D लसीने सुरक्षिततेचे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे डीजीसीआयने हा निर्णय घेतला आहे. ही लस पूर्णपणे स्वदेशी असून डीएनएवर आधरित असणारी जगातील पहिली लस आहे. देशात आणखी एक लस उपलब्ध झाल्यामुळे आता लसीकरणाला गती येण्याची शक्यता […]
Tag: #vaccine
भारतात लहान मुलांसाठी येणार आणखी एक लस
जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी लसीच्या चाचणीची परवानगी मागितली आहे.देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करताना तज्ज्ञांनी यामध्ये मुलांसाठी धोक्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आता लहान मुलांसाठी आणखी एक लस लवकरच येण्याची शक्यता आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी लसीच्या चाचणीची परवानगी मागितली आहे. […]
कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी
देशातून अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत देशातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस द्यावा का हा प्रश्न उपस्थित होतोय. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता नसल्याचं म्हटलंय. WHOने बुधवारी म्हटलं की, सर्वप्रथम आपल्याला जगातील गरीब देशांना […]
भारतामध्ये आढळून आल्या कोव्हिशिल्डच्या बनावट लसी; WHO आणि सीरमकडून दुजोरा
सध्या देशभरात व्यापक लसीकरणाची मोहीम राबवली जात असून १८ वर्षावरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, मॉडर्ना, स्पुटनिक व्ही आणि नुकतीच परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन या लसी भारतीयांना दिल्या जात आहेत.नागरिकांमध्ये या पार्श्वभूमीवर दिलासा मिळाल्याची भावना असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने एका गंभीर गोष्टीकडे संपूर्ण जगाचे आणि विशेषत: भारताचे लक्ष वेधले आहे. […]
महाराष्ट्रात एंट्रीसाठी दोन्ही ‘डोस’ आवश्यक, RTPCR रिपोर्ट नसेल तर 14 दिवस राहावे लागेल ‘क्वारंटाइन’
महाराष्ट्र सरकारने कोरोनादरम्यान बाहेरून येणार्या प्रवाशांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात जर कुणी प्रवाशी प्रवेश करत असेल तर त्याने कोरोना व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. पुरावा म्हणून त्यांना व्हॅक्सीन सर्टिफिकेट सुद्धा सोबत ठेवावे लागेल. जर व्हॅक्सीन घेतलेली नसेल तर निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवणे आवश्यक राहील. हा रिपोर्ट 72 तासांमधील असावा. जर या […]
सावधान! ‘या’ लसीमुळे नागरिकांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या; जीवघेणी ठरू शकते लस.शास्त्रज्ञांनी दिला इशारा
जगावर आलेल्याला करून नामक संकटापासून वाचण्यासाठी लसीकरणाची मोहीम सर्वत्र सुरु आहे. दरम्यान, आता या मोहिमेत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ऑक्सफोर्ड ऍस्ट्राझेनेकाच्या करोना लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या किंवा ब्लड क्लॉटिंग झाल्याची काही प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, हे अत्यंत घातक असू शकते, या विषयावर पहिल्यांदाच केलेल्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांनी हा इशारा दिला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल […]
कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा बदलणार; मोदी सरकारचा निर्णय
देशात जास्तीत जास्त कोरोना लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 18+ नागरिकांना लस दिली जाते आहे. अशात आता कोरोना लसीकरणात मोठा बदल होणार आहे. कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतराबाबत आहे. सध्या देशात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची कोविशिल्ड, हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाची […]
पंढरपूर शहरासह तालुक्यात सोमवारी कॅव्हॅक्सिन लस देण्यात येणार
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी १८ वर्षावरील व कोवीन पोर्टलवर नोंदणी केलेल्या व्यक्तींना कॅव्हॅक्सिन लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.या सत्रासाठी संबंधित लसीकरण केंद्रात स्पॉट बुकिंगची सोय नसल्याने ज्यांनी कोवीन पोर्टलवर नोंदणी केली आहे त्यांनीच लसीकरणासाठी यावे असे आवाहनही करण्यात आले आहे. पंढरपुर शहरातील उपजिल्हा रुग्णालय,नागरी […]
धक्कादायक! दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टर वर्षभरात तीनदा पॉझिटिव्ह
लस घेऊनही कोरोनाची लागण झाली, एकदा कोरोना होऊनही दुसऱ्यांदा कोरोना झाला असे प्रकार आपण आतापर्यंत ऐकले आहेत. मात्र मुंबईतील एका डॉक्टरला चक्क एक दोन वेळा नाही तर तीन वेळा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ते देखील फक्त वर्षभरात आणि लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही. डॉ. श्रुती हलारी असे त्या डॉक्टरचे नाव असून महानगर पालिकेने तिच्या […]
सप्टेंबरपासून 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या लसीकरणास सुरुवात ?
कोरोना महामारीच्या तिसर्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना व्हॅक्सीनबाबत एक दिलासादायक बातमी आहे. अखिल भारतीय वैद्यकीय संस्था , दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, झायडस कॅडिलाने ट्रायल पूर्ण केली आहे आणि त्यांना आता आपत्कालीन वापराची परवानगी मिळण्याची प्रतिक्षा आहे. सप्टेंबर महिन्यापासून 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे सुद्धा लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. जर […]