ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात एंट्रीसाठी दोन्ही ‘डोस’ आवश्यक, RTPCR रिपोर्ट नसेल तर 14 दिवस राहावे लागेल ‘क्वारंटाइन’

 महाराष्ट्र सरकारने कोरोनादरम्यान बाहेरून येणार्‍या प्रवाशांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात जर कुणी प्रवाशी प्रवेश करत असेल तर त्याने कोरोना व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. पुरावा म्हणून त्यांना व्हॅक्सीन सर्टिफिकेट सुद्धा सोबत ठेवावे लागेल. जर व्हॅक्सीन घेतलेली नसेल तर निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवणे आवश्यक राहील. हा रिपोर्ट 72 तासांमधील असावा. जर या नियमांचे पालन केले नाही तर बाहेरून येत असलेल्या प्रवाशांना महाराष्ट्रात 14 दिवसासाठी क्वारंटाइन व्हावे लागेल.

महाराष्ट्र सरकारकडून याबाबतीत आता कडक धोरण अवलंबण्यात येत आहे. कारण महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शंका व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारकडून प्रत्येक पाऊल वेळेपूर्वीच उचलले जात आहे, ज्यामुळे तिसर्‍या लाटेत मोठा विध्वंस होऊ नये.

डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे 5 लोकांचा मृत्यू

राज्यात डेल्टा प्लसचा कहर तर दिसून लागला आहे. महाराष्ट्र सरकारने दुजोरा दिला आहे की, राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनपर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत जास्त माहिती समोर आलेली नाही.

सावधगिरी बाळगणे हाच उपाय

व्हॅक्सीनचा सुद्धा या व्हेरिएंटवर किती परिणाम होतो, यावर सुद्धा संशोधन सुरू आहे. अशावेळी संभ्रमाची स्थिती आहे. व्हॅक्सीनचे दोन डोस घेतलेल्या काही व्यक्ती संक्रमित झाल्याने ही स्थिती आणखी वाढली आहे. यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

व्हॅक्सीनचे दोन डोस घेतलेल्या दोघांचा मृत्यू

चिंतेची बाब ही आहे की, ज्या दोन लोकांचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे त्यांनी व्हॅक्सीनचे दोन्ही
डोस घेतले होते. अशावेळी कोरोना विरूद्ध सुरक्षा कवच तयार होते, परंतु तरीसुद्धा या व्हायरसने त्यांचा जीव घेतला.

महाराष्ट्रात पाच लोकांचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे, या सर्वांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त होते. राज्यात अजूनही डेल्टा प्लसची एकुण 66 प्रकरणे समोर आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *