ताज्याघडामोडी

सावधान! ‘या’ लसीमुळे नागरिकांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या; जीवघेणी ठरू शकते लस.शास्त्रज्ञांनी दिला इशारा

जगावर आलेल्याला करून नामक संकटापासून वाचण्यासाठी लसीकरणाची मोहीम सर्वत्र सुरु आहे. दरम्यान, आता या मोहिमेत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ऑक्सफोर्ड ऍस्ट्राझेनेकाच्या करोना लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या किंवा ब्लड क्लॉटिंग झाल्याची काही प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, हे अत्यंत घातक असू शकते, या विषयावर पहिल्यांदाच केलेल्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांनी हा इशारा दिला आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल एनएचएस फाउंडेशन ट्रस्टच्या डॉ.सुई पॉवर्ड यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या टीमने लसीकरणानंतरच्या प्रकरणांचे विश्लेषण केले. ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयाच्या लसीची भारतात कोविशिल्ड नावाने निर्मिती होत आहे.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, लसीकरणानंतरच्या रोगप्रतिकारक थ्रोम्बोसाइटोपेनिया थ्रोम्बोसिसच्या (व्हीआयटीटी) पहिल्या 220 प्रकरणांचा अभ्यास केला आणि असे दिसून आले की व्हीआयटीटीचा मृत्यू दर 22 टक्के आहे.
प्लेटलेट्स कमी झाल्यास आणि रक्ताच्या गुठळ्या जास्त झाल्या तर मृत्यूचा धोका वाढतो. यासोबतच खूप कमी प्लेटलेट आणि रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानंतर, रक्तस्त्राव होण्याचा धोका 73 टक्क्यांपर्यंत वाढतो. मात्र, या लशीबाबत हे प्रकार अत्यंत दुर्मिळ किंवा कमी असल्याचे पॉवर्ड यांनी म्हटले.

पॉवर्ड यांनी म्हटले, की 50 वर्षाहून कमी वय असलेल्या आणि ही लस घेतलेल्या 50 हजार लोकांपैकी केवळ एकाच व्यक्तीमध्ये ही समस्या दिसून येते. मात्र, आमच्या अभ्यासात असं दिसलं आहे, की व्हीआयटीटी विकसित झाल्यास हे अत्यंत धोकादायक आहे. तरुण आणि निरोगी लोकांमध्ये हे सर्व दिसण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, मात्र याचा मृत्यूदर अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *