ताज्याघडामोडी

धक्कादायक! दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टर वर्षभरात तीनदा पॉझिटिव्ह

लस घेऊनही कोरोनाची लागण झाली, एकदा कोरोना होऊनही दुसऱ्यांदा कोरोना झाला असे प्रकार आपण आतापर्यंत ऐकले आहेत. मात्र मुंबईतील एका डॉक्टरला चक्क एक दोन वेळा नाही तर तीन वेळा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ते देखील फक्त वर्षभरात आणि लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही.

डॉ. श्रुती हलारी असे त्या डॉक्टरचे नाव असून महानगर पालिकेने तिच्या स्वॅबचे सॅम्पल जनुकीय क्रमनिर्धारणेसाठी घेतले आहेत. डॉ. श्रुती हिला सर्वप्रथम 17 जून 2020 ला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 29 मे 2021 ला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली. तोपर्यंत डॉ. श्रुती यांचे लसीचे दोन डोस देखील पूर्ण झालेले होते.

त्यानंतर आता 11 जुलैला देखील तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

‘डॉक्टर असल्याने मी गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत आहे. मात्र तिसऱ्यांदा माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा मी देखील हादरलेच. माझ्यात लक्षणं नव्हती पण तरिही मी रुग्णालयात दाखल झाली. अवघ्या 45 दिवसात मी पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. माझं सर्व कुटुंबच या वेळेस पॉझिटिव्ह होतं’, असे डॉ. श्रुती यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *