ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरासह तालुक्यात सोमवारी कॅव्हॅक्सिन लस देण्यात येणार

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी १८ वर्षावरील व कोवीन पोर्टलवर नोंदणी केलेल्या व्यक्तींना कॅव्हॅक्सिन लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.या सत्रासाठी संबंधित लसीकरण केंद्रात स्पॉट बुकिंगची सोय नसल्याने ज्यांनी कोवीन पोर्टलवर नोंदणी केली आहे त्यांनीच लसीकरणासाठी यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.     

पंढरपुर शहरातील उपजिल्हा रुग्णालय,नागरी आरोग्य केंद्र जुना कराड नाका यासह तालुक्यातील कासेगाव,करकंब आणि भाळवणी या तीन ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवॅक्सिन लसीचे प्रत्येकी ३०० डोस उपलब्ध करण्यात येणार आहेत.या लसीकरणासाठी १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजले पासून कोवीन पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.   

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *