फार्मसी अधिकारी या पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परिक्षेत केंद्रावरील देखरेख अधिकाऱ्यानेच परिक्षार्थी असलेल्या पुतण्यास कॉपी पुरविल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी वैभव पवार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन परिक्षा केंद्रावरील देखरेख अधिकारी चंद्रकांत गायके (५५, रा. खडकेश्वर), परीक्षार्थी अभिषेक गायके (२४, रा. लासुर स्टेशन) या दोघांविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. टीसीएस कंपनीचे […]
ताज्याघडामोडी
सरकारने उचलले मोठे पाऊल, लवकरच खाद्यतेलाचे दर कमी होणार!
जूनमध्ये केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात केली होती. सरकारने रिफाइंड सोयाबीन तेल आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क 17.5 टक्क्यांवरून 12.5 टक्के केले होते. केंद्र सरकारने काही प्रमुख खाद्यतेलांवरील कमी आयात शुल्काची व्यवस्था एका वर्षाने वाढवली आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती खाली येतील, अशी सरकारला आशा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बिघडलेले स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा रुळावर […]
अल्पवयीन मैत्रिणीसोबत खोलीत सापडला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, तिच्या मित्राने केलं भयंकर कांड
मध्य प्रदेशात इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याचा खून झाला आहे. त्याचं नाव पंकज यदुवंशी आहे. हा खून प्रेमप्रकरणातून झाल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेल्या पंकज यदुवंशीचा मृतदेह गंज पोलीस स्टेशन हद्दीतल्या हमालपूरमध्ये 19 डिसेंबर रोजी सकाळी आढळला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात […]
बायकोला आला राग अन् पतीला दिला विजेचा शॉक, नंतर 2 दिवस घरात घडलं भयंकर
पती-पत्नीत भांडणं होणं हे काही नवीन नाही. काही वेळा वाद विकोपालाही जातात; मात्र अलीकडच्या काळात पती-पत्नीतल्या वादांनी टोक गाठल्यावर एकमेकांचा जीव घेण्यासही मागे-पुढे पाहिलं जात नसल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात आग्र्यात घडली आहे. त्यात एका महिलेने आपल्या पतीला विजेचा शॉक देऊन मारल्याचा आरोप आहे. आग्र्यात एका महिलेने आपल्या पतीची […]
दुकान बंद करून माय-लेकी घरात झोपी गेल्या; सकाळी शेजाऱ्यांनी दरवाजा उघडताच दृश्य बघून हातपाय लटपटले
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वृध्द आईसोबत झोपी गेलेल्या लेकीचा आणि तिच्या आईचा अज्ञातांनी गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे माण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. संपदाबाई लक्ष्मण नरळे (वय 75 ) आणि त्यांची मुलगी नंदाबाई भिकू आटपाडकर (वय 58 ) अशी मृतांची नावे आहेत. संपदाबाई आणि […]
चिमुकली 14व्या मजल्यावरुन खाली कोसळली, खरचटलंही नाही; दोन गोष्टींनी वाचले प्राण
देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याचीच प्रचिती मुंबईतील एका घटनेत आली आहे. मुंबईत इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून 13 वर्षीय मुलीला कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही.सखीरा शेख, असं या मुलीचं नाव आहे. मंगळवारी पहाटे कुर्ला येथील नेहरू नगर येथे ही घटना घडली. इतक्या उंचावरुन पडूनही मुलीला काहीच न झाल्याने लोक आश्चर्य […]
भाजपच्या युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुखाने रेल्वेखाली येऊन जीवन संपवलं
भाजपचे युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख सुनील धुमाळ यांनी केली रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरानळी रेल्वे ट्रॅकवर धुमाळ यांनी आत्महत्या केली आहे.सुनील धुमाळ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरा नळीमध्ये धुमाळ राहायला होते. आत्महत्या प्रकरणी रेल्वे पोलिसात […]
बापानेच आजीला संपवल्याचा राग, नातवाने जन्मदात्याचा काटा काढला; नेमकं काय घडलं?
पती-पत्नीच्या वादाच्या रागातून सासूच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या जावयाचा त्याच्याच पोटच्या मुलाने खून करून आजीच्या हत्येचा बदला घेतला आहे. या प्रकरणी पारनेर पोलिसांनी आरोपी सुभाष संतोष शेंडगे याच्याविरोधात वडिलांची हत्या केल्यामुळे हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिली. मयत संतोष शेंडगे याने पत्नी भानूबाई व […]
वादातून नातवाने आजीला संपवलं, आई-वडिलांनीही दिली साथ, पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मात्र…
जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नुकतीच एक हत्येची घटना समोर आली आहे. क्षुल्लक वाद झाल्याने सुनेने पती आणि मुलाच्या मदतीने वृद्ध सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही थरारक घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामडोंगरी येथे घडली. सुलकाबाई चाचेरे (८०) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी किसन जोंधरू चाचेरे, त्याची पत्नी सेवनबाई (५०) […]
कर्मयोगी इंस्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनियरिंग विभागातील पाच विद्यार्थ्याची नागपूर येथील कोलब्रो प्रा. लि. या नामांकित कंपनी मध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. नागपूर येथील कोलब्रो प्रा. लि या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून सिव्हिल इंजिनियरिंग विभागातील हृषीकेश गाजरे, सौरभ गाढवे, हर्षवर्धन नागटीळक, […]