ताज्याघडामोडी

अल्पवयीन मैत्रिणीसोबत खोलीत सापडला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, तिच्या मित्राने केलं भयंकर कांड

मध्य प्रदेशात इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याचा खून झाला आहे. त्याचं नाव पंकज यदुवंशी आहे. हा खून प्रेमप्रकरणातून झाल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेल्या पंकज यदुवंशीचा मृतदेह गंज पोलीस स्टेशन हद्दीतल्या हमालपूरमध्ये 19 डिसेंबर रोजी सकाळी आढळला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला होता. त्याआधारे पोलिसांनी तपास केला आणि धक्कादायक बाब समोर आली. 

पोलीस तपास करत असतानाच पंकजचा मृत्यू त्याच्या अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाल्यामुळे झाल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये उघड झालं. त्यामुळे पंकजचा खून झाल्याची पोलिसांना खात्री पटली आणि त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. कुटुंबीयांनीही खुनाचाच संशय व्यक्त केला होता. या संशयाच्या आधारे हेमंत यादव आणि देवेंद्र यादव यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींनी पोलिसांना सांगितलं, की हेमंत यादवची एका अल्पवयीन मुलीशी मैत्री होती. हेमंतने त्या मुलीला सोमवारी रात्री हमलापूरमधल्या पंकज यदुवंशीच्या खोलीत पकडलं होतं. त्यानंतर हेमंतने त्याचा मित्र देवेंद्रला बोलावून पंकजला माचना नदीच्या काठावर नेऊन मारहाण केली. त्यानंतर तो मेला असं समजून त्याला सोडून ते दोघेही निघून गेले. त्यांनी पंकजचा मोबाइलही नदीकाठी फेकून दिला. पंकज घटनास्थळापासून काही अंतरावर चालला आणि तो पडला असेल आणि त्याचा मृत्यू झाला, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी घटनास्थळाहून मृताचा मोबाइल जप्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *