देशातील बँकांवर नियंत्रण ठेवणारी सर्वात मोठी बँक आरबीआय ने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत केरळमधील अनंतशयनम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बँकेचा परवाना रद्द केला आहे. अनंतशयनम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 19 डिसेंबर 1987 रोजी परवाना देण्यात आला होता, जो RBI ने रद्द केला आहे. सेंट्रल बँकेने बँकिंग नियमन कायदा 1949 मधील कलम 56 आणि कलम 36A (2) […]
ताज्याघडामोडी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील उर्वरित मंडळाना मिळणार पीकविमा – आ. आवताडे
प्रतिनिधी – यंदाच्या खरीप हंगामातील पावसाने दडी मारल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मतदारसंघातील उर्वरित मंडळाच्या शेतकऱ्यांना आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून पिकविमा मिळणार असल्याने मतदार संघातील सर्व मंडळे या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी खूप मोठा फायदा झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात जुलै […]
अभिजीत पाटील यांनी चौंडी येथील उपोषणास भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला
पंढरपूर व मंगळवेढ्यातील समाजातील पदाधिकारी उपस्थित प्रतिनिधी/- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने गेले १७ दिवस चालू असलेल्या आमरण उपोषणाला राष्ट्रवादीचे नेते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व पंढरपूर व मंगळवेढ्यातील धनगर समाजातील पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन जाहीर पाठिंबा पत्र दिले. गेली अनेक वर्षे महाराष्ट्रामध्ये धनगर समाज एस.टी. आरक्षणाच्या […]
शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवा, अजित पवार गटाची आक्रमक भूमिका
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने शरद पवार गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. शरद पवार गटातील आमदारांनी पक्ष विरोधी कृत्य केल्यामुळे या आमदारांना आपत्र करण्यात यावं अशी मागणी करत अजित पवार गटाने विधीमंडळाच्या अध्यक्षांकडे याचिका दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधिमंडळ अध्यक्षांकडे अजित पवार गटाकडून पक्ष विरोधी कृत्य करणाऱ्या शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ निलंबित […]
१६ आमदारांच्या अपात्रतेबाबातच्या निकालापूर्वी राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना, हालचालींना वेग
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच अंतिम निकाल येण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या निर्णयाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने एकप्रकारे विधानसभा अध्यक्षांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा […]
“मराठा समाज पुन्हा आक्रमक, खुल्या प्रवर्गात एकही जागा नसल्याचा तीव्र निषेध”
येवला उपविभागीय कार्यालयाने पोलीस पाटील भरती संदर्भात परिपत्रक जाहीर केले. यामध्ये तब्बल ६१ जागा असून या सर्वच्या सर्व जागा अनुसूचित जाती- जमाती व राखीव वर्गासाठी आहेत. एकूण २१७ मंजूर पदांपैकी १६१ पदे कार्यरत असून त्यापैकी ५६ रिक्त पदे आहेत. ५ पदे संभाव्य रिक्त होणारी आहेत. असे मिळून ६१ रिक्त पदे भरण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये […]
डॉक्टर रस्त्यात बेशुद्धावस्थेत पडले होते, पोलिसांनी पाहणी करताच धक्कादायक सत्य समोर
पैशांच्या वादातून रिक्षाचालकाने डोक्यात दगड घालून डॉक्टरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शिळ-डायघर परिसरात घडला असून पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. वसीम सत्तार मेमन असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिळ-डायघरमधील फडके पाडा येथील तलावासमोर रोडलगत एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मंगळवारी सकाळी पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी […]
महाराष्ट्रातील तहानलेल्या भागाची चिंता मिटणार; पुढील ३ दिवसांत पाऊस बरसणार, असा आहे ताजा अंदाज
परतीच्या पावसाचे वेध लागल्यामुळे मराठवाड्यात चिंता वाढली आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे मोठी तूट निर्माण झाली आहे. पुढील तीन दिवसात समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. धरणात पाणीसाठा नसल्यामुळे विभागात बिकट स्थिती आहे. मराठवाड्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. विभागात ४८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक सोयाबीनचे ५३.२ टक्के क्षेत्र […]
स्वत:साठी आणलेली दारू पत्नीने… ; पतीला राग अनावर, पुढं जे केलं ते धक्कादायक
जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. स्वतःसाठी पिण्यास आणलेली दारू पत्नीने पिल्याचा राग मजुराच्या डोक्यात गेला, या मजुराने संतापाच्या भरात पत्नीला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून आणि तिचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना भुसावळ तालुक्यातील हतनूर गावात घडली आहे. पत्नीचा मृत्यू सर्पदंशाने झाला असा बनाव मजुर पतीने केला होता, मात्र डॉक्टरांनी केलेल्या शवविच्छेदनात […]
गणेश उत्सवावर शोककळा; तरुणाच्या खुनानं हादरले नागरिक
एकीकडं गणेश उत्सवाचा जल्लोष सुरू असून सिंधुदुर्ग जिल्हा मात्र तरुणाच्या खुनानं हादरला आहे. या तरुणावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. ही घटना देवगड तालुक्यातील मुणगे मसवी रस्त्यावर घडली आहे. प्रसाद परशुराम लोके असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. प्रसाद लोके याचा खून झाल्याचं उघडकीस आल्यानं मिठबांव इथल्या गणेश उत्सवावर शोककळा पसरली आहे. […]