गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गणेश उत्सवावर शोककळा; तरुणाच्या खुनानं हादरले नागरिक

एकीकडं गणेश उत्सवाचा जल्लोष सुरू असून सिंधुदुर्ग जिल्हा मात्र तरुणाच्या खुनानं हादरला आहे. या तरुणावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आल्याचं उघड झालं आहे.

ही घटना देवगड तालुक्यातील मुणगे मसवी रस्त्यावर घडली आहे. प्रसाद परशुराम लोके असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. प्रसाद लोके याचा खून झाल्याचं उघडकीस आल्यानं मिठबांव इथल्या गणेश उत्सवावर शोककळा पसरली आहे. प्रसाद लोकेचा खून करुन मारेकऱ्यांनी त्याच्याच गाडीत टाकून पलायन केल्याचं आज सकाळी उघडकीस आलं. यावेळी मारेकऱ्यांनी प्रसाद लोकेच्या गाडीची चावी आणि फोन घेऊन पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रसाद लोके हा मिठबांव इथं महा ई-सेवा केंद्र चालवत असून तो भाड्यानं चारचाकी देण्याचा व्यवसायही करत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास प्रसाद लोकेला अज्ञात व्यक्तिचा फोन आला होता. यावेळी त्यांना सकाळी रुग्णाला घेऊन कुडाळ इथं न्यायचं असल्यानं तुझी गाडी घेऊन ये, असं सांगितलं होतं, अशी माहिती प्रसाद लोकेच्या निकटवर्तीयांनी दिली. प्रसाद लोके सोमवारी सकाळी उठून त्याच्या मालकीची वॅगनार कार घेवून भाडं नेण्यासाठी मसवी मार्गे गेला. मात्र आपण कोणाचं भाडं घेतलं आहे, त्याबद्दलची पूर्ण माहिती त्यानं घरात आई वडील व पत्नीला दिली नसल्यानं याबाबत उलगडा होऊ शकला नसल्याचं त्याच्या निकटवर्तीयानं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *