ताज्याघडामोडी

“मराठा समाज पुन्हा आक्रमक, खुल्या प्रवर्गात एकही जागा नसल्याचा तीव्र निषेध”

येवला उपविभागीय कार्यालयाने पोलीस पाटील भरती संदर्भात परिपत्रक जाहीर केले. यामध्ये तब्बल ६१ जागा असून या सर्वच्या सर्व जागा अनुसूचित जाती- जमाती व राखीव वर्गासाठी आहेत. एकूण २१७ मंजूर पदांपैकी १६१ पदे कार्यरत असून त्यापैकी ५६ रिक्त पदे आहेत. ५ पदे संभाव्य रिक्त होणारी आहेत. असे मिळून ६१ रिक्त पदे भरण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा नसल्यामुळे खुल्या प्रवर्गातील जागेसाठी इच्छुक असणाऱ्यांची मोठीच निराशा झाली आहे. हीच बाब येथील युवा नेते पांडुरंग शेळके पाटील,अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाजाच्या वतीने खुल्या प्रवर्गात एकही जागा नसल्याबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

येथील उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांना जाब विचारण्यासाठी येथील प्रांत कार्यालय गाठले व तालुक्यातील पोलीस पाटील भरतीबाबत विचारणा केली. यावेळी खुल्या वर्गासाठी जागा सोडा, अन्यथा भरती बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. येथील प्रांत अधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांना बोलावून भरती प्रक्रियेतील बाजू समजून सांगितली. ते म्हणाले, सध्या आपल्या प्रांत विभागात खुल्या वर्गासाठी एकही जागा देता येत नाही. या सर्व जागा आरक्षणावरती ठरलेल्या असतात. खुल्या वर्गासाठी १०४ जागा आरक्षित असून त्यापैकी काही जागा या आधीच्या भरती प्रक्रियेत भरल्या गेलेल्या आहेत. तसेच खुल्या वर्गासाठी पुढील भरतीमध्ये जागा असतील. पोलीस भरती प्रक्रियेच्या जागा भरणे हा विषय आमच्या विभागाशी संबंधित नसल्यामुळे भरती प्रक्रिया सुरळीतपणे व पारदर्शकपणे होणार आहे. त्यासाठी आपण सहकार्य करावे असे प्रांत यांनी सांगितले. परंतु या उत्तराने कार्यकर्त्यांचे समाधान झाले नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच येणाऱ्या काळात पोलीस पाटील भरतीमध्ये या खुल्या वर्गासाठी जास्तीत जास्त जागा असाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *