ताज्याघडामोडी

११ हजार ४० मतांनी धंगेकर यांचा दणदणीत विजय! भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार

महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. आज कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय मिळवला आहे. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेला हा मतदारसंघ आता मविआने ताब्यात घेतला आहे. 

ताज्याघडामोडी

आजारी चिमुकल्याला दवाखान्यात नेतानाच मृत्यूने गाठलं, भरधाव ट्रकची धडक, आईची मृत्यूशी झुंज

विटांची वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने बाईकला जबर धडक दिली. या भीषण अपघातात ४ वर्षांच्या चिमुकल्यासह तिघे जण ठार झाले आहेत, तर एक महिला गंभीर रित्या जखमी झाली. लहानग्याला दवाखान्यात नेत असताना काळाने घाला घातला. ही दुर्घटना काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरीअडगाव आंबेटाकळी रोडवर घडली. बोरीअडगाव येथील हार्दिक रोहित वानखडे हा ४ वर्षीय […]

ताज्याघडामोडी

नमामी चंद्रभागा योजनेअंतर्गत १७ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर

चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी राज्य सरकारचे पुढचे पाऊल  भारताची दक्षिण काशी म्हणून लौकिक असणाऱ्या पंढरपूर शहरामध्ये वारीनिमित्त लाखो वारकरी भाविक पंढरीत दाखल होतात. सांप्रदायिक आणि अध्यात्मिक राजधानी असणाऱ्या पंढरपूर मध्ये येणारा वैष्णवांचा मेळा चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी जमा होतात.पंढरपूर नगरीच्या जलतीर्थ आख्यायिकेची परंपरा जतन करणारी चंद्रभागा नदी गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषण आणि घाणीचे साम्राज्य यांच्या […]

ताज्याघडामोडी

गुरुवारी पंढरीत ठाकरे समर्थकांकडून शिवगर्जना मेळाव्याचे आयोजन

उपनेते,माजी खासदार,आमदार,जेष्ठ पदाधिकारी उपस्थित रहात मार्गदर्शन करणार   गुरुवार दि. 2 मार्च पासून सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून शिवगर्जना अभियानाची सुरुवात करण्यात येणार असून याचा शुभारंभ गुरुवारी पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठ येथे भव्य मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या मेळाव्यात  पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या सोलापूर […]

ताज्याघडामोडी

बैलांना पाणी पाजताना पाय घसरला, मामाकडे शिकणाऱ्या भाच्याचा कालव्यात बुडून मृत्यू

शेतीकामात मामाला मदत म्हणून बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा कालव्यात पाय घसरुन बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील महिंदळे या गावात घडली आहे. मयूर नरेंद्रसिंग ठाकरे (वय २२ वर्ष, रा. गणेशपुरा, ता. साक्री) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयुर हा दहावीपासून महिंदळे येथे असलेल्या त्याच्या मामाकडे शिकण्यासाठी […]

ताज्याघडामोडी

आईने आयुष्य संपवलं, मग दोघी मुली विहिरीजवळ गेल्या अन्… सुन्न करणारी घटना

आईसह दोन मुलींनी केलेल्या आत्महत्येमुळे अकोले तालुका हादरला आहे. मन्याळे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनिता जाधव (वय ४८), प्राजक्ता जाधव (वय २२) आणि शितल जाधव (वय १८) अशी मृतांची नावे आहेत. घडलेल्या प्रकारामुळे गावात शोककळा परसली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मन्याळे गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. […]

ताज्याघडामोडी

आदल्या दिवशी निरोप समारंभ झाला, दुसऱ्या दिवशी पोहायला गेला; मात्र पुन्हा परतलाच नाही…

दहावीच्या विद्यार्थ्याचा कोयना नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कराडमध्ये घडली आहे. शनिवारी दहावीचा निरोप समारंभ झाला आणि रविवारी राहुलने कायमचा निरोप घेतला. मंगळवारी सायंकाळी कोयना पुलाखाली नदीपात्रात त्याचा मृतदेह सापडला. राहुल परिहार असे बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. राहुल हा कराड आगाशिवनगरचा रहिवासी होता. तीन दिवसानंतर जुना कोयना नदीपात्रातून राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यास […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दहावीत शिकणारा सचिन एकाएकी बेपत्ता; चार दिवसांनी बॉडी सापडली, दोन्ही हात मोडलेले

अचानक घरातून बेपत्ता झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह गावातील एका शेतात हात तोडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून अपहरण करून हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील बोरसर गावात घडली. सचिन प्रभाकर काळे असे मृत मुलाचे […]

ताज्याघडामोडी

शिवसेना उपविभाग प्रमुख हत्या रवींद्र परदेशी यांची हत्या

रवींद्र परदेशी यांच्यावर चॉपरने हल्ला करण्यात आला. रूग्णालयात जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. ठाणे स्टेशन रोडवर मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमागे पूर्व वैमनस्येचा हेतू असल्याचा संशय ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जे एन रणवरे यांनी व्यक्त केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या) अंतर्गत […]

ताज्याघडामोडी

शेतातला हरभरा काढण्याच्या गडबडीत घात झाला, पदर अडकून महिला मळणी यंत्रात ओढली गेली अन्…

शेतकरी एकदा आपल्या शेतामध्ये काम करायला लागला की तो तहानभूक विसरुन काम करतो. आपल्या शेतात उगवलेल्या पीकाची लवकरात लवकर कापणी करुन ते बाजारात कसं नेता येईल, यासाठी बळीराजाची कायमच धावपळ सुरु असते. त्यासाठी सर्व गोष्टी विसरुन, भान हरपून शेतकरी शेतात काम करत असतात. मात्र, या नादात अनावधनाने घडलेली एखादी चूक अनर्थ घडवण्यास आणि जीव घेण्यास […]