ताज्याघडामोडी

नमामी चंद्रभागा योजनेअंतर्गत १७ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर

चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी राज्य सरकारचे पुढचे पाऊल 

भारताची दक्षिण काशी म्हणून लौकिक असणाऱ्या पंढरपूर शहरामध्ये वारीनिमित्त लाखो वारकरी भाविक पंढरीत दाखल होतात. सांप्रदायिक आणि अध्यात्मिक राजधानी असणाऱ्या पंढरपूर मध्ये येणारा वैष्णवांचा मेळा चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी जमा होतात.पंढरपूर नगरीच्या जलतीर्थ आख्यायिकेची परंपरा जतन करणारी चंद्रभागा नदी गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषण आणि घाणीचे साम्राज्य यांच्या कचाट्यात सापडली असल्याचे दिसून येत आहे.

     राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारच्या नामामी गंगे अभियानाच्या धर्तीवर राज्यातील विठ्ठल भक्तांची बहीण म्हणून संतांनी आपल्या अभंगात वर्णन केलेल्या चंद्रभागा नदीच्या शुद्धीकरणासाठी,हि नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी २०१६ मध्ये नामामी चंद्रभागा अभियानाची घोषणा करण्यात आली होती.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरीत या योजनेचा भव्य शुभारंभ सोहळा पार पडला होता.या योजने अंतर्गत त्यावेळी राज्य सरकारने दिलेल्या निधितून यमाई तलाव येथे तुळशी वृदावन साकारले तर पंढरीत नामसंकीर्तन सभागृहाचे कामही सुरु झाले.मात्र पुढे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर या योजनेसाठी थेट राज्य सरकारकडून निधी मिळाला नव्हता.मात्र चंद्रभागा नदीतील वाढते प्रदूषण पाहता नामामी चंद्रभागा योजनेस गती मिळावी अशी मागणी वारंवार होऊ लागली होती.यातूनच जिल्हा नियोजन समितीकडून ६ कोटींचा निधी देण्याचा निर्णयही झाला मात्र कामास गती मिळाली नव्हती.

   नमामी चंद्रभागा योजनेकडे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर दुर्लक्ष झाले आहे,भाविक आणि या नदीच्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या गावांसाठी हि योजना अतिशय महत्वपूर्ण होती.हि बाब लक्षात घेत नामामी चंद्रभागा योजनेसाठी गती मिळावी व निधी मिळावा अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी मार्च २०२२ मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशात अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी कपात सूचना दाखल करीत मांडली होती.त्यामुळे शासनास त्याची दखल घ्यावी लागली खरी पण आजतागायत निधी उपलब्ध होत नव्हता.मात्र राज्यात आता सत्तेत आलेल्या महायुती शासनाने या बाबत आमदार समाधान आवताडे यांचा पाठपुरावा लक्षात घेत निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.         

  याचीच दखल घेत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी या नामामी चंद्रभागा योजनेस गती मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.तर नमामी चंद्रभाग योजनेस गती मिळावी म्हणून आमदार समाधान आवताडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेत या योजनेस गती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.  

  नदीला जोडणाऱ्या प्रदूषण मार्गाला प्रतिबंध करणे, उपलब्ध पाणी स्रोत यांचे शुद्धीकरण करणे, नदी पात्राच्या दोन्ही किनाऱ्यावर वृक्ष लागवड करणे, नदी किनाऱ्यांचे सौंदर्ययीकरण करणे, पंढरपूर वारीनिमित्त येणाऱ्या वारकरी भक्तांच्या आरोग्य सेवेसाठी आवश्यक सोयी – सुविधा उपलब्ध करणे, शौचालय निर्मिती करणे आदी सुविधा या बाबींचा विकास करणे हे नमामी चंद्रभागा योजनेच्या उदिष्ठात समाविष्ट आहे.       

   आज दिनांक १ मार्च रोजी राज्य शासनाने या योजनेसाठी १७ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून यामुळे पुढील काळात विठ्ठल भक्तांच्या साठी पवित्र समजल्या जाणाऱ्या चंद्रभागा नदीस प्रदूषणमुक्त करण्यासाठी व निर्मळ करण्याच्या कामास गती मिळणार आहे.          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *