ताज्याघडामोडी

उद्योगपती अदानीला जोरदार झटका

काही तासात गमावले २.३७ लाख कोटी गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या एका अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली असून आजही समभागातील घसरण थांबली नाही. अदानी ग्रुपच्या समभागातील शेअर्सवर विक्रीचा दबाव असल्यामुळे शेअर बाजारावरही दबाव निर्माण होत आहे. बुधवारपेक्षाही मोठी घसरण आज, म्हणजेच शुक्रवारी दिसून येत […]

ताज्याघडामोडी

व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरील वादातून गोळीबार

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या गोळीबाराने या परिसरात खळबळ उडाली होती. बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात वर्गणी कोण जास्त देणार, यावरुन व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरील वादावादीतून गोळीबार झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं असून त्यात गोळीबार करणार्‍या व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. […]

ताज्याघडामोडी

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज काय?

महाराष्ट्रात सातत्यानं वातावरणातबदल होत आहे.कधी थंडीचा जोर तर कधी पावसाची हजेरी अशी स्थिती निर्माण होत आहे. सध्या राज्यात थंडीचा कडाका आहे. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.  उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळं कमी दाबाचे […]

ताज्याघडामोडी

प्रजासत्ताक दिनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात ‘वंदे मातरम’ ऐवजी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा

उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या वेळी धर्मांध घोषणा दिल्याचा प्रकार घडला.विशेष म्हणजे एएमयू कॅम्पसमध्ये एनसीसी (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) च्या विद्यार्थ्यांनी या घोषणा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘अल्लाहू अकबर’ आणि ‘नारा-ए-तकबीर’ अशा घोषणा दिल्या. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर, विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि भाजप नेते डॉ. निशित शर्मा यांनी अलीगड […]

ताज्याघडामोडी

28 वर्षाच्या सुनेवर 70 वर्षाच्या सासऱ्याचा जडला जीव, लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल

गोरखपूरमध्ये झालेल्या एका लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या या फोटोची चर्चा सर्वत्र भलतीच रंगली आहे. गोरखपूर येथील बडहलगंज कोतवाली क्षेत्रातील छपिया उमराव गावात राहणारे कैलास यादव (70) आणि त्यांची सून पूजा (28) या दोघांनी मंदिरात जाऊन विवाह केला. वयोवृद्ध सासऱ्यासोबत सूनेने विवाह केल्याची गावात सर्वत्र चर्चा रंगली असतानाच त्यांच्या लग्नाचे व्हायरल झालेल्या […]

ताज्याघडामोडी

मुलाच्या आजारपणामुळे टेंशनमध्ये असलेल्या भाजप नेत्याने कुटुंबासह विष घेत केली ‘आत्महत्या’

मध्य प्रदेशातील विदिशा येथे भाजपचे नगरसेवक संजीव मिश्रा यांनी दोन मुले आणि पत्नीसह विष प्राशन करून आत्महत्या केली. मुलांचा जागीच मृत्यू झाला तर पती-पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.आत्महत्येच्या काही वेळापूर्वी संजीवने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ज्यात त्यांनी लिहिले की, ‘देव हा आजार, मस्कुलर डिस्ट्रॉफी डीएमडी, अगदी शत्रूच्या मुलांनाही देऊ नये’. पोस्ट […]

ताज्याघडामोडी

आई-वडील कामावर गेल्यानंतर भयंकर घटना; ३ वर्षीय मुलगी घरातून गायब, नंतर आढळला मृतदेह

भिवंडीमध्ये तीन वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, आणखी एका तीन वर्षांच्या मुलीच्या हत्येने भिवंडी हादरली. हत्येचा हा प्रकार बुधवारी सकाळी समोर आला असून या मुलीचा मृतदेह येथील चाळीतील पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये मिळाला. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांची विविध पथके आरोपीचा शोध घेत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या […]

ताज्याघडामोडी

अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटील यांचे खळबळजनक विधान; म्हणाले.

राज्याच्या राजकारणात दि. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी एक महत्वाची घटना घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजभवनात जात पहाटेच शपथविधी केला होता. त्यानंतर मात्र या प्रकरणाची राज्यात खूप चर्चा झाली. त्यातच त्या प्रसंगावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एक विधान केले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी […]

ताज्याघडामोडी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ध्वजारोहण झाल्यानंतर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिल परिसरातील नागरिकांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.धुळे शहरातील चितोड रोड मिल परिसरातील नागरिक तुळसाबाईचा मळा या ठिकाणी गेल्या ३५ ते ४० वर्षापासून राहत आहेत. ते राहत असलेल्या घरांचा हक्काचा सातबारा मिळावा म्हणून धुळे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त व भूमि […]

ताज्याघडामोडी

राज्यात पावसाला पोषक वातावरण; ‘या’ जिल्ह्यांत बरसणार पाऊस

मागील काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे नागरिक चांगलेच गारठले होते. परंतु आता किमान तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. तर दुसरीकडे थंडीमुळे शेतकऱ्यांच्या पिकावर देखील प्रादुर्भाव होत होता. एकीकडे गारठा कमी झाला, परंतु दुसरीकडे आता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. कारण […]