उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या वेळी धर्मांध घोषणा दिल्याचा प्रकार घडला.विशेष म्हणजे एएमयू कॅम्पसमध्ये एनसीसी (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) च्या विद्यार्थ्यांनी या घोषणा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘अल्लाहू अकबर’ आणि ‘नारा-ए-तकबीर’ अशा घोषणा दिल्या. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ट्विटरवर, विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि भाजप नेते डॉ. निशित शर्मा यांनी अलीगड पोलिस आणि एसएसपी कलानिधी नैथानी यांना टॅग करत तक्रार केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर धर्मांध घोषणा देण्यामागील काय अर्थ आहे? पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले. याबाबत पोलिसांशी बोलणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. आता या व्हिडिओवर विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आले आहे.