ताज्याघडामोडी

उद्योगपती अदानीला जोरदार झटका

काही तासात गमावले २.३७ लाख कोटी

गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या एका अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली असून आजही समभागातील घसरण थांबली नाही. अदानी ग्रुपच्या समभागातील शेअर्सवर विक्रीचा दबाव असल्यामुळे शेअर बाजारावरही दबाव निर्माण होत आहे. बुधवारपेक्षाही मोठी घसरण आज, म्हणजेच शुक्रवारी दिसून येत आहे. हिंडेनबर्गचा गंभीर आरोपांमुळे अदानी समूहाचे गुंतवणूकदार शेअर्सची विक्री करण्यासाठी घाई करत आहेत.

शुक्रवारी सकाळी सलग दुसऱ्या सत्रात अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभागात मोठी पडझड झाली. बाजार उघडताच अदानी समूहाचे शेअर्स १९ टक्क्यांनी घसरले. न्यूयॉर्कस्थित हिंडेनबर्ग रिसर्चने समूहावर शेअर बाजारात हस्तक्षेप केल्याच्या आरोपानंतर समूहाच्या कंपन्यांचे शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशीही उलथापालथ झाली.

आज, आठवड्याच्या शेवटच्या व्यापाराच्या सुरुवातीच्या सत्रात अदानी ग्रीनचे शेअर्स १६% पेक्षा अधिकने घसरले. या कंपनीचा शेअर १,५६४ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घाला आहे. त्याच वेळी, अदानी टोटल गॅस १६ टक्क्यांहून अधिक घसरला असून दुसरीकडे, आजपासून अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ सब्स्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. पण याआधी हा स्टॉक ६ टक्क्यांहून अधिक घसरला आणि एफपीओच्या किमतीच्या जवळपास पोहोचला. याशिवाय अदानी पॉवर, अदानी विल्मरमध्ये ५ टक्क्यांचे लोअर सर्किट लागले, तर अदानी पोर्टमध्ये जवळपास ५ टक्के घट नोंदवण्यात आली.

⚡️Republic Day Offer⚡️🇮🇳🇮🇳️
टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट
स्मार्ट वॉच फक्त 2495/-
👓TITAN , Fastrack
फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट*⭐ बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI
👉3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क -7507 995 995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *