ताज्याघडामोडी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ध्वजारोहण झाल्यानंतर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिल परिसरातील नागरिकांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.धुळे शहरातील चितोड रोड मिल परिसरातील नागरिक तुळसाबाईचा मळा या ठिकाणी गेल्या ३५ ते ४० वर्षापासून राहत आहेत. ते राहत असलेल्या घरांचा हक्काचा सातबारा मिळावा म्हणून धुळे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त व भूमि अभिलेख कार्यालयाकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. मात्र प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या नागरिकांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकार्यालयावर आत्मदहनाचा इशारा दिला होता.

ध्वजारोहण झाल्यानंतर मिल परिसरातील नागरिकांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर येत घोषणाबाजी करत स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना अडवले व त्यांच्याकडील डिझेलच्या बाटल्या हिसकवण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्व आंदोलनकर्त्यांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

⚡️Republic Day Offer⚡️🇮🇳🇮🇳️
टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट
स्मार्ट वॉच फक्त 2495/-
👓TITAN , Fastrack
फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट*⭐ बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI
👉3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क -7507 995 995

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *