कोविड रुग्ण, ऐंशी वर्षावरील नागरिकांना टपालाव्दारे मतदानाची सुविधा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती पंढरपूर, दि. 19:- विधानसभेच्या पंढरपूर मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी कोविड रुग्ण, दिव्यांग आणि ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरिकांना टपालाव्दारे मतदान करता येईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे सांगितले. त्याचबरोबर मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते संध्याकाळी […]
ताज्याघडामोडी
देशभरातले टोलनाके हटवणार
येत्या वर्षभरात देशातील सर्व टोल नाके बंद करण्यात येतील आणि टोलची रक्कम जीपीएस इमेजिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमा केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली.गडकरी यांनी टोल नाके बंद करण्याचा आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना सांगितले की, गेल्या सरकारनी शहरांमध्ये अनेक ठिकाणी टोल नाके उभे करून पैसे […]
अजनसोंड येथील शेतकऱ्याच्या पीएचडी करत असलेल्या एकुलत्या एक मुलाचा महावितरणच्या गलथान कारभाराने घेतला जीव
महावितरणच्या कनिष्ठ अभियंता वाघमारे आणि काथवटे यांनी हलगर्जीपणामुळे पंढरपूर तालुक्यातील अजनसोड येथील शेतकरी उत्तम शंकर घाडगे वय 60 वर्ष यांच्या एकुलत्या एक मुलास विजेचा धक्का बसून आपला जीव गमवावा लागला आहे.या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदर प्रकरणी महावितरणच्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी फिर्यादी उत्तम शंकर घाडगे यांनी पंढरपुरातील […]
स्वेरीचे विद्यार्थी श्रीनाथ देशमुख हे सुवर्ण पदकाने सन्मानित
स्वेरीचे विद्यार्थी श्रीनाथ देशमुख हे सुवर्ण पदकाने सन्मानित पंढरपूर- स्वेरी अभियांत्रिकीत शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये अंतिम वर्षात शिकत असलेल्या श्रीनाथ जयवंत देशमुख यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ‘कै.श्रीमान भाऊसाहेब गांधी सुवर्णपदक ’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल-मे २०२० या परीक्षेमध्ये सोलापूर विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयातून […]
संत तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूत भाविकांच्या प्रवेशावर निर्बंध
राज्यात मागील बऱ्याच दिवसांपासून कोरोना संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक नियम पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. ज्या धर्तीवर परंपरागत चालत आलेल्या सोहळ्यांवरही कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव, आषाढी एकादशीच्या निमित्तानं निघणारी पायवारी यामागोमाग आता कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळ्यासाठी भाविकांना बंदी घालण्यात […]
25 लाखाच्या बदल्यात 50 लाख देण्याच्या बहाण्याने हॉटेल व्यवसायिकाची फसवणूक
25 लाखाच्या बदल्यात 50 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत 23 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. आरोपींनी 25 लाख घेऊन हातात कागदात गुंडाळून डुप्लिकेट बंडल देऊन फसवणूक केली आहे. प्रवीण प्रकाश (वय 30, काळेवाडी), मालेश सुरेश गावडे (वय 42) व व्यंकटरमण वसंतराव बाहेकर (वय […]
पुण्यातील आणखी एका टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
कात्रज-कोंढवा रस्त्यावर एका तरुणावर गोळीबार करणाऱ्या मुनाफ पठाण टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी संघटीत टोळ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिल्यानंतर मोक्का आणी तडीपारीच्या कारवाया वाढल्या आहेत. मुनाफ रियाज पठाण ( 23) , कृष्णाराज सुर्यकांत आंदेकर (दोघेही रा.डोके तालमी जवळ, नाना पेठ), विराज जगदिश यादव(25,रा.हहपसर), आवेश अशफाक सय्यद(20,रा.गणेश पेठ), अनिकात ज्ञानेश्वर काळे(25,रा.नाना पेठ), अक्षय नागनाथ […]
वाळूच्या कारणातून दोन गटात झालेल्या हाणामारीत डबल मर्डर
माण तालुक्यातील नरवणे येथे बुधवारी वाळूच्या कारणातून बुधवारी दोन गट आपसात भिडले यावेळी झालेल्या तुफान हाणामारीत दोघांचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. माण तालुक्यातील नरवणे येथे आज सकाळी ही घटना घडली. तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाळुचा लिलाव घेतला होता. हा लिलाव मयत चंद्रकांत जाधव यांना मिळाला होता. याचा राग जाधव यांच्या भावकीतील लोकांना होता. आज […]
आईला मारहाण करणाऱ्या मुलाचा खून
भंडारा .भाजी चांगली बनविली नाही’, असे म्हणून आईला शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या मुलाचा वडिलांसह दोन भावंडांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर भीतीपोटी त्याचा मृतदेह जंगलात पुरला. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेचे बिंग १५ मार्च रोजी उघडकीस आले. याप्रकरणी वडील आणि दोन भावंडांविरुद्ध साकोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी साकोली तालुक्यातील तुडमापुरी […]