ताज्याघडामोडी

धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाची आत्महत्या; रेल्वेखाली उडी मारून केला आयुष्याचा शेवट

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरत आहे. अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. सरकारकडून आश्वासन मिळूनही एसटी आरक्षण दिले जात नसल्याने आलेल्या नैराश्यातून लातूर जिल्ह्यातील आष्टी या गावच्या रमेश चंद्रकांत फुले (वय ३६)या तरुनाने रेल्वेखाली उडीमारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. आत्महत्येपुर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. आंदोलने करूनही आरक्षण […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सहावीत शिकणाऱ्या मुलाला निर्दयीरित्या संपवलं; उसाच्या शेतात सापडला मृतदेह

साताऱ्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील हिवरे (ता. कोरेगाव) येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केला आहे. विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ (१२) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना कुंभारकी येथील उसाच्या शेतात घडली. विक्रम याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला याचे गूढ […]

ताज्याघडामोडी

UPI Payment पेमेंट करताय का ? ३१ डिसेंबरपर्यंत करा हे काम नाहीतर ट्रांजेक्शन होईल बंद

पेमेंट करण्यासाठी तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म वापरत आहात का? जर तुम्ही गूगल पे, फोन पे, पेटीएम, भीम किंवा इतर ऑनलाइन बँकिंगचा वापर करत असाल तर तुमच्याकडे UPI आयडी असणे आवश्यक असतं. डिजिटल पेमेंट अ‍ॅप्सद्वारे पैशांची देवाण-घेवाण करायची असेल तर UPIआयडी आवश्यक असतो. पण युपीआयचा वापर करणाऱ्यांपैकी काही UPI वापरकर्त्यांचा व्यवहार सेवा बंद होऊ शकते. नेमकं काय […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेतीचा वाद विकोपाला; चुलत भावाला संपवलं, पुरावा नष्ट करण्यासाठी धडपड, मात्र एका चुकीनं अडकला जाळ्यात

खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे शेताच्या बांधावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे याने त्याचा चुलत भाऊ मोहन सुरेश धायगुडे याचा डोक्यात दगड घालून खून केला. ही भयंकर घटना अहिरे (ता. खंडाळा) येथे घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अहिरे (ता. खंडाळा) येथील शेरी नावाच्या शिवारात मोहन धायगुडे आणि […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नी- मुलीसह मंदिरात पूजा केली, नंतर त्यांनाच पुलावरून नदीत ढकललं

गुजरातच्या वलसाडमधून एक अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे एक इसमाने त्याची पत्नी आणि 11 वर्षांची लेक या दोघींनाही नदीत धक्का दिला. पाण्याच बुडून त्या दोघींचाही दुर्दैवाने मृत्यू झाला. एवढंच नव्हे तर त्या दोघींना नदीत ढकलल्यावर त्या इसमान स्वत:देखील नदीत (जीव देण्यासाठी) उडी मारली. मात्र आजूबाजूच्या लोकांनी पटकन धाव घेऊन त्याला वाचवलं. […]

ताज्याघडामोडी

सिद्धेवाडीचे सुपुत्र डॉ.विठ्ठल जाधव यांचा उद्या होणार राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्काराने गौरव

वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल सिद्धेवाडी येथील डॉ.विठ्ठल शिवाजी जाधव यांची स्व. हरीश्चंद्र फाऊंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या “राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कारासाठी” निवड करण्यात आली आहे. येत्या 24 डिसेंबर रोजी सोलापूर येथील फडकुले सभागृहात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा विचार करून या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड […]

ताज्याघडामोडी

पुतण्यासाठी कायपण! चक्क केंद्र अधिकाऱ्यानेच परिक्षार्थी पुतण्यास कॉपी पुरवली; दोघांवर गुन्हा दाखल

फार्मसी अधिकारी या पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परिक्षेत केंद्रावरील देखरेख अधिकाऱ्यानेच परिक्षार्थी असलेल्या पुतण्यास कॉपी पुरविल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी वैभव पवार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन परिक्षा केंद्रावरील देखरेख अधिकारी चंद्रकांत गायके (५५, रा. खडकेश्वर), परीक्षार्थी अभिषेक गायके (२४, रा. लासुर स्टेशन) या दोघांविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. टीसीएस कंपनीचे […]

ताज्याघडामोडी

सरकारने उचलले मोठे पाऊल, लवकरच खाद्यतेलाचे दर कमी होणार!

जूनमध्ये केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात केली होती. सरकारने रिफाइंड सोयाबीन तेल आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क 17.5 टक्क्यांवरून 12.5 टक्के केले होते. केंद्र सरकारने काही प्रमुख खाद्यतेलांवरील कमी आयात शुल्काची व्यवस्था एका वर्षाने वाढवली आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती खाली येतील, अशी सरकारला आशा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बिघडलेले स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा रुळावर […]

ताज्याघडामोडी

अल्पवयीन मैत्रिणीसोबत खोलीत सापडला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, तिच्या मित्राने केलं भयंकर कांड

मध्य प्रदेशात इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याचा खून झाला आहे. त्याचं नाव पंकज यदुवंशी आहे. हा खून प्रेमप्रकरणातून झाल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेल्या पंकज यदुवंशीचा मृतदेह गंज पोलीस स्टेशन हद्दीतल्या हमालपूरमध्ये 19 डिसेंबर रोजी सकाळी आढळला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बायकोला आला राग अन् पतीला दिला विजेचा शॉक, नंतर 2 दिवस घरात घडलं भयंकर

पती-पत्नीत भांडणं होणं हे काही नवीन नाही. काही वेळा वाद विकोपालाही जातात; मात्र अलीकडच्या काळात पती-पत्नीतल्या वादांनी टोक गाठल्यावर एकमेकांचा जीव घेण्यासही मागे-पुढे पाहिलं जात नसल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात आग्र्यात घडली आहे. त्यात एका महिलेने आपल्या पतीला विजेचा शॉक देऊन मारल्याचा आरोप आहे. आग्र्यात एका महिलेने आपल्या पतीची […]