ताज्याघडामोडी

आ.अभिजित पाटील यांनी घेतली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी माढा, टेंभुर्णी, करकंब, मोडनिंबला जागा उपलब्ध करून देण्याची केली मागणी मेंढापूर एमआयडीसीच्या जागेबाबतही महत्वपूर्ण चर्चा

माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजित पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधीकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेत या मतदार संघातील विविध प्रलंबित प्रश्न तसेच प्रस्तावित व अपेक्षित विकास कामांवर चर्चा केली.यामध्ये या मतदार संघातील खालील महत्वपूर्ण विषयाकडे जिल्हाधीकारी सोलापूर यांचे लक्ष वेधत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार अभिजित पाटील यांच्यावतीने देण्यात आली.या मध्ये खालील महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
१) उजनी धरणावर पर्यटन स्थळ विकसित होण्यासाठी आराखड्यावर काम तातडीने होण्याबाबत चर्चा झाली.
२) माढा, टेंभुर्णी, करकंब, मोडनिंब ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व त्यासाठी परवानगी मिळावी.
३) सर्व विभागाची जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेण्याबाबत चर्चा झाली.
४) सिना-माढा उपसा सिंचन योजना कॅनॉलला जानेवारी मध्ये पाणी सोडण्याची गरज असल्याने कालवा सल्लागार बैठक घेण्याबाबत चर्चा झाली.
५) माढा तहसील व टेंभुर्णी येथे सुरू असलेल्या बांधकामातील त्रुटी वरती चर्चा झाली..
६) मेंढापुर एमआयडीसी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली.
७) मोडनिंब एमआयडीसी अधिसूचनेनुसार भूसंपादन सुरू करावे व एमआयडीसी लवकरात लवकर सुरू होण्याबाबत चर्चा केली.
८) माढा तहसील व प्रांत ऑफिस मधील कामे खूप दिवसापासून प्रलंबित आहेत. त्याबाबत आढावा घेऊन नोंदी, रस्ता, क्षेत्र दुरुस्ती, रेशन कार्ड, पीएम किसान, लाडकी बहीण योजना व इतर योजनेतील होणाऱ्या दिरंगाई बाबतीत चर्चा केली.
९) मतदार संघात अनधिकृत व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची सूचना दिली.
१०) मोडनिंब मुख्य रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदाराकडून होणारा विलंब, व कामाचा दर्जा राखला जावा याबाबत चर्चा केली.
११) राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या टोल नाक्यावर होणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे नागरिकांचा वेळ जातो, त्यामुळे फास्ट टॅग लाईन अधिक वाढवण्यात यावी यावर चर्चा झाली.
तसेच सोलापूर जिल्हा विकास आराखडा, विविध सरकारी योजना, रस्ते विकास, जलसंधारणाची कामे आदी महत्त्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *